घराचं बांधकाम सुरु असताना सापडला मुघलकालीन खजिना, पण मालकाचा आनंद क्षणभरच टिकला कारण...

Mughal Gold Treasure Found: घराचे बांधकाम सुरू असताना मजुरांना मुघलकालीन खजिना सापडला. घर मालक एका क्षणात मालामाल झाला पण त्याचा हा आनंद क्षणभरच टिकला आहे.   

Updated: May 19, 2023, 02:17 PM IST
घराचं बांधकाम सुरु असताना सापडला मुघलकालीन खजिना, पण मालकाचा आनंद क्षणभरच टिकला कारण...  title=
mughal treasure found during house excavation labour ran away with gold brick

Mughal Treasure Found: घरात खोदकाम सुरू असताना मजुरांना सापडला प्राचीन खजिना. (Antique Treasure)  या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खजिन्यात असलेले सोन्याचे शिक्के आणि सोन्याच्या वीटा पाहताच मजुरांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मजुरांचा आरडा-ओरडा आणि गोंधळ ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी एकच गर्दी करण्यास सुरुवात केली. याच गोंधळात एका मजुराने केलेला कारनामा वाचून घर मालकांने डोक्यालाच हात मारला. 

उत्तर प्रदेशातील औरैय जिल्ह्यातील ही घटना आहे. दिपक नावाच्या व्यक्तीचे घराचे काम सुरू होते. घराची जुनी भिंत तोडण्यासाठी काही मजुर बोलवण्यात आले होते. भिंत तोडत असताना जमिनीत खोदकाम करत असताना मजुराना टणक वस्तू जाणवल्या. सुरुवातीला लोखंडी भांडे असतील असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. 

घरात सापडला खजिना

अधिक खोदकाम करत असताना मजुरांना सोन्याची विट आणि दोन सोन्याचे शिक्के सापडले. सोन्याचा मौल्यवान खजिना सापडताच मजुरांचे डोळे फिरले. त्यानंतर त्यांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सापडलेल्या खजिन्यात असलेली वीट अष्टधातुंची असल्याचे सांगण्यात येत आहे. याची किंमत लाखोंच्या घरात आहे. 

ल्युडो खेळता खेळता सासु जावयाच्या प्रेमात, रात्री भेटायला बोलवलं पण घडला भलताच ड्रामा

सरकार दरबारी जमा

दरम्यान, खजिना पाहताच एका मजुराची नियत फिरली आणि त्यातून सोन्याची विट घेऊन तो पसार झाला आहे. याबात संबंधित विभागाला सुचना दिली असून त्यांनी उर्वरित खजिना ताब्यात घेतला आहे. तसंच, त्याची सरकार दरबारी नोंद करण्यात आली आहे. तसंच, सरकारकडून त्या फरार मजुराचा शोधही घेण्यात येत आहे. 

स्थानिक लोकांमध्ये चर्चा

स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ७ मे रोजी खजिना सापडला होता. मात्र, घर मालकाने याबाबत कोणालाच माहिती दिली नाही. मात्र स्थानिक लोकांमध्ये खजिन्याबाबत सतत चर्चा होत होती. स्थानिक लोकांकडून पोलिस आणि प्रशासनाला घरात मौल्यवान खजिना सापडल्याची माहिती मिळाली.

गोव्याला जायचा बेत आखताय, सरकारने पर्यटकांना दिली Good News, लगेच जाणून घ्या

मजुराचा व्हिडिओ व्हायरल

स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाने घर मालकासोबत संपर्क केला. तसंच, त्याला खजिना सरकारकडे जमा करण्यास सांगितले. मात्र, खजिना सरकारला देण्यास मालक तयार नव्हता. तेव्हा पोलिसांनी कायदे व नियम समजावून सांगितल्यानंतर तो खजिना जमा करायला तयार झाला. तर, घटनास्थळाचा एक सीसीटिव्ही व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यात एक मजुर घटनास्थळावरुन फरार होताना दिसत आहे. त्याच्याकडे सोन्याची विट असल्याची चर्चा आहे. पोलिस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.