लखनऊ : उत्तर प्रदेशातलं मुगलसराय जंक्शन आता पंडित दीनदयाळ उपाध्याय नावानं ओळखलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारनं गेल्या वर्षी मुगलसराय स्थानकाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारनं रेल्वे मंत्रालयाकडे हा प्रस्ताव दिला होता. आता रेल्वे मंत्रालयानंही त्याला मंजुरी दिलीय.
नागरिकों की मांग को देखते हुए उत्तर प्रदेश में मुगलसराय जंक्शन का नाम परिवर्तित कर पं. दीन दयाल उपाध्याय जंक्शन किया गया, मुझे खुशी है कि अंत्योदय जैसा महान विचार देने वाले पं .दीन दयाल जी के नाम से अब यह जंक्शन जाना जाएगा। pic.twitter.com/PoHDGQmu5i
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 4, 2018
लोकाग्रहास्तव मुगलसराय स्थानकाचं नाव पंडित दीनदयाल उपाध्याय करत असल्याचं ट्विट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलंय. १९६८ मध्ये पंडित दीन दयाल उपाध्याय यांचा मृतदेह मुगलसराय स्थानकावर रहस्यमय परिस्थितीत सापडला होता.