फ्रान्सवरुन माहेरी आलेल्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली आणि...

MP News: सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली महिला फ्रान्सवरुन आपल्या माहेरी आली. घरात आनंदाचं वातावरण होतं. सर्व काही ठिक सुरु असतानाच अघडीत घडलं. तिच्या 11 महिन्यांच्या मुलीचा पुढच्या महिन्यता वाढदिवस होता. पण त्याआधीच महिलेने जग सोडलं. 

राजीव कासले | Updated: Jan 18, 2024, 03:03 PM IST
फ्रान्सवरुन माहेरी आलेल्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली आणि...  title=

Trending News : फ्रान्समध्ये मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर  (Software Engineer) असलेली महिला आपल्या माहेरी आली होती. मुलगी आल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. तिच्या 11 महिन्यांच्या मुलीचा पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत पहिला वाढदिवस होता. त्यामुळे सगळेच जणं सेलिब्रेशनच्या तयारीला लागले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. ही महिला बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली आणि तिथेच अचानक तिला मृत्यूने गाठलं. दीड तासांनंतरही बाथरुममधून बाहेर येत नसल्याने घरच्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. आतलं दृष्य पाहून घरचे हादरले. बाथरुमध्ये ती महिला निपचित पडली होती. कुटुंबियाना तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. (Engineer Dies)

काय आहे नेमकी घटना
राजधानी दिल्लीतल्या अशोक गार्डन परिसरातील ही संपूर्ण घटना आहे. मृत महिलेचं नाव पूर्वा साहू असून ती अवघ्या 26 वर्षांची होती. पूर्वा नेटलिंक कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. तिचं सासर मध्यप्रदेशमधल्या ऊज्जैनमध्ये असून पती आशीष साहू हा सुद्धा केमिकल इंजिनअर आहे. 

पूर्वी आणि आशिष दिल्लीतल्या गाझियाबादमध्ये राहात होते. सहा महिन्यांपूर्वी कामानिमित्ताने आशिष आणि पूर्वी फ्रान्सला गेले. आशीषच्या भावाचं 6 फेब्रुवारीला लग्न होणार होतं. यासाठी दोघंही भारतात आले. पूर्वा भोपाळमध्ये मुलीसह आपल्या माहेरी आली होती. मंगळवारी म्हणजे 17 जानेवारीला पूर्वीने आपल्या केसांना मेहंदी लावली आणि थोड्यावेळाने ती आंघोळीला बाथरुममध्ये गेली. पण दीड तास झाला तरी पूर्वी बाथरुममधून बाहेर येत नसल्याने घरचे घाबरले. त्यांनी पूर्वाला आवाजा दिला. पण आतूनही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे घरच्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. बाथरुममध्ये पूर्वी निपचित पडली होती. तिच्या नाकातून रक्त येत होतं. त्याच परिस्थितीत तिला रुग्णलायात दाखल करण्यात आलं. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

11 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू
पूर्वाच्या मृत्यूने माहेरी आणि सासरी दुख:चा डोंगर उभा राहिलाय. पूर्वा आणि आशिषच्या एकुलत्या एक मुलीचा फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस होता, आणि दोघंही खूप उत्साहित होते. मुलीचा पहिला वाढदिवस जोरदार साजरा करण्याचा दोघांनी प्लान केला होता. पण त्यापूर्वीच पूर्वाने जगाचा निरोप घेतला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

कार्डिआक अरेस्टची शक्यता
पूर्वाचा मृत्यू कार्डिआक अरेस्टने झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूर्वाला कोणताही आजार नव्हता. तिच्या कुटुंबातही हार्टशी संबंधित कोणालाही त्रास नव्हता. बातरुममध्ये गिझरमुळे मृत्यू झाल्याचीही शक्यता नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.