पत्नीला शिकवण्यासाठी विमा पॉलिसीतून पैसे काढले, कर्जही काढलं... नोकरी लागताच प्रियकराबरोबर पळून गेली

कर्ज काढून पत्नीला शिकवलं, दोन वर्ष कर्जाचा बोझा सहन केला. विमा पॉलिसीतून पैसे काढून पत्नीच्या शिक्षणासाठी खर्च केला. पण यानंतरही पत्नी प्रियकरासोबत रहात असल्याचा आरोप एका पतीने केला आहे. इतकंतच नाही तर धमकी देऊन मुलीलाही आपल्याबरोबर घेऊन गेल्याचा दावा त्याने केला आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 9, 2023, 06:51 PM IST
पत्नीला शिकवण्यासाठी विमा पॉलिसीतून पैसे काढले, कर्जही काढलं... नोकरी लागताच प्रियकराबरोबर पळून गेली title=

Viral News : उत्तर प्रदेशमधलं ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य प्रकरण (SDM Jyoti Maurya) संपूर्ण देशभर गाजलं. आलोक मौर्यने आपल्या पत्नीला कर्ज काढून शिकवलं, पण मोठ्या पदावर सरकारी नोकरी लागल्यावर ज्योती मौर्यने पतीला सोडलं. अशीच आणखी एक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) अनुपपूरमध्ये समोर आली आहे. अनुपपूरमध्ये राहाणाऱ्या एका व्यक्तीन जिल्हा कलेक्टरला आपली पत्नीला परत आणावं अशी विनंती केली आहे. 

अनुपपूरमधल्या पकरिया गावात जोहन नावाचा व्यक्ती राहातो. त्याची पत्नी मिनाक्षी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करत होती. तिच्या शिक्षणात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी त्याने सव्वालाख रुपयेृांचा कर्ज काढलं. पत्नीला नर्सिंगचं (Nursing) प्रशिक्षण दिलं. तब्बल दोन वर्ष त्याने कर्जाचा बोझा सहन केला. इतकंच नाही तर पत्नीच्या शिक्षणासाठी त्याने आपल्या विमा पॉलिसीतूनही पैसे काढले. पण यानंतर त्याच्या आयुष्यात धक्कादायक वळण आलं. 

पत्नी मिनाक्षीने खंडवा जिल्ह्यातून नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण केलं. पण यानंतर तीने जोहनला पती मानण्यापासून इन्कार केला. इतकंच काय तीने एकत्र राहण्यासही नकार दिला. आपल्या सातवर्षांच्या मुलीलाही ती जबरदस्तीने आपल्याबरोबर घेऊन गेली. पतीन जोहानने दिलेल्या माहितीनुसार मिनाक्षीचं पहिलं लग्न झालं होतं. पण ती आपल्या पतीबरोबर राहात नव्हती. त्यानंतर जोहन आणि मिनाक्षीचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी एका मंदिरात लग्न केलं. तीच शिक्षण झालं असल्याने तिने नर्सिंगच्या नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले. नर्सच्या प्रशिक्षणासाठी तीने खंडवा आरोग्यकेंद्रात प्रवेश घेतला. 

मिनाक्षीचं नर्सिंगंच शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी जोहनने कर्ज काढलं. प्रशिक्षणादरम्यान सुट्टी पडली की ती माहेरी राहिला जायची, पण सासरी येत नव्हती.  जेव्हा जोहनने तिला सासरी येण्याविषयी विचारलं तेव्हा तीने नकार दिला. आपल्या आयुष्यात दुसरा व्यक्ती आला असून मी तुझ्यासोबत राहू शकत नाही असं त्याला सांगितलं. 

इतकंच नाही तर आपल्या सात वर्षांच्या मुलीला मिनाक्षीने भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने धमकी देत घेऊन गेली असा आरोप जोहानने केलाय. पीडित जोहानने याप्रकरणी थेट अनुपपूरच्या कलेक्टरकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. आपली पत्नी आणि मुलीला आपल्याकडे पुन्हा घेऊन येण्याची विनंती केली आहे. 

काय आहे ज्योती मौर्य प्रकरण
2010साली ज्योती नावाच्या मुलीचं लग्न आलोक यांच्यासोबत झालं. लग्नानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवण्याची तिची इच्छा होती. आलोकने ज्योतीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कमाईतून ज्योतीला शिकवलं. एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्येही तिचं अॅडमिशन केलं.  शिक्षण पूर्ण करुन तिला मोठ्या पदावरची सरकारी नोकरी लागली. पण अधिकारी होताच ज्योतीने सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला आणि आलोकपासून वेगळी झाली.