धक्कादायक, नोकरीत अडचण ठरत असल्याने आईने घेतला पोटच्या गोळ्याचा जीव

सासरच्या मंडळींनी महिलेवर केले गंभीर आरोप....

Updated: Jul 8, 2021, 07:08 AM IST
धक्कादायक, नोकरीत अडचण ठरत असल्याने आईने घेतला पोटच्या गोळ्याचा जीव title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील (Delhi)महेंद्र पार्क भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी  एका महिलेवर स्वतःच्याचं मुलाला विष पाजून ठार मारल्याचा आरोप करण्यात येत आहे. महिलेवर असे गंभीर आरोप तिच्या सासरच्या मंडळींकडून केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिला एका अंगनवाडीत काम करत होती. पण बाळ झाल्यानंतर महिलेला घराबाहेर पडण्यास त्रास होऊ लागला. या किरकोळ गोष्टीमुळे आईने आपल्या दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन तिचा खून केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला सतत आपले विधान बदलत आहे. या घटनेनंतर मात्र महिलेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञाच्या देखरेखीखाली  महिलीची कॉन्सिलिंग केली जात आहे. या प्रकरणावर पोलीस अधिक तपास करत आहे. 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुलाचं नाव दर्शन आहे. नेहमी प्रमाणे दर्शनला जेव्हा घरच्यांनी खेळण्यासाठी बोलावलं तेव्हा मुलाच्या आईने तो झोपला आहे असं सांगितलं. त्यानंतर बराचं वेळ झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य बाळाला पाहाण्यासाठी गेले. तेव्हा दर्शन बेशुद्ध पडला. त्यानंतर मुलाच्या आजी त्याच्या वडिलांना हाक मारली. तेव्हा त्याच्या तोंडातून फेस येत होता.'

या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबाने तिच्यावर मुलाला विष देवून  मारल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. आता पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. यासह पोस्टमॉर्टम रिपोर्टचीही प्रतीक्षा केली जात आहे. जेणेकरुन मुलाच्या मृत्यूचे कारण काय  समजू शकेल.