मुंबई : देशात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 23 हजारांच्या पुढे गेली आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण 23 हजार 77 वर गेली आहे. यापैकी सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 610 आहे, तर कोरोनापासून आतापर्यंत 718 लोकांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर 4 हजार 749 रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत येथे 6430 रुग्ण आढळले असून त्यात 283 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 789 लोकं बरे झाले आहेत. दिल्लीला मागे सोडत गुजरात दुसर्या स्थानावर आला आहे. आतापर्यंत येथे 2624 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात 112 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली तिसर्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत येथे 2376 रुग्ण आढळले असून त्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राजस्थानमध्ये आतापर्यंत 1964 रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश पाचव्या क्रमांकावर आला आहे. आतापर्यंत येथे 1699 रुग्ण आढळले असून 83 लोकांचा मृत्यू झाला आहे.
राज्य, रुग्णांची संख्या आणि मृत्यू
तामिळनाडू - 1683 - 20
उत्तर प्रदेश - 1510 - 24
आंध्र प्रदेश - 895 - 27
अंदमान-निकोबार - 22 - 0
अरुणाचल प्रदेश - 1 - 0
आसाम - 36 - 1
बिहार - 153 - 2
चंडीगड - 27 - 0
छत्तीसगड - 36 - 0
हरियाणा - 272 - 3
हिमाचल प्रदेश - 40 - 1
जम्मू-काश्मीर - 427 - 5
झारखंड - 53 - 3
कर्नाटक - 445 - 17
केरळ - 447 - 3
लद्दाख - 18 - 0
मणिपूर - 2 - 0
मेघालय - 12 - 1
मिझोराम - 1 - 0
ओडिशा- 90 - 1
पुद्दुचेरी - 7 - 0
पंजाब - 277 - 16
तेलंगणा - 960 - 24
त्रिपुरा - 2 - 0
उत्तराखंड - 47 - 0
पश्चिम बंगाल - 514 - 15