मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी शक्तिकांत दास विराजमान आहे. अशा मोठ्या पदावर काम करण्याऱ्या व्यक्तींचा पगार जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येकाची असते. तर नोटांवर ज्या व्यक्तीची स्वाक्षरी आहे त्या व्यक्तीच्या पगारचा आकडा देखील त्याच्या पदा एवढाचं मोठा असणार यात काही शंका नाही. तर रिझर्व्ह बॅंकेनेच याचं उत्तर दिले आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगाराची माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे.
गव्हर्नरपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचा पगार डेप्युटी गव्हर्नर पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या पगारापेक्षा ३१ हजार ५०० रूपयांनी अधिक आहे. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर सध्या चार व्यक्ती कार्यरत आहे. या चार डेप्युटी गव्हर्नरचा पगार २ लाख ५५ हजार रूपये आहे.
३१ डिसेंबर २०१९ रोजी रिझर्व्ह बँकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मासिक पगाराची माहिती जाहीर केली आहे. तर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी असलेल्या शक्तीदास दास यांच्या हातात दर महिन्याला २ लाख ८७ हजार रूपये पगार येतो.
जेव्हा उर्जित पटेल बँकेच्या गव्हर्नर पदी होते तेव्हा पगारांमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. उर्जित पटेल यांचा पगार २.५० लाख करण्यात आला होता. १ जानेवारी २०१६ पासून हा बदल करण्यात आला होता. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचाही मूळ पगार २.५० लाख असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.