नवी दिल्ली : देशातील मान्सून हंगाम शेवटाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे उत्तर भारतात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात देशात सुमारे ०६ टक्के पाऊस कमी पडला आहे.
पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातूनही मान्सून परतला आहे. दक्षिण भारतातही कर्नाटक आणि तेलंगनात पावसाचे प्रमाण कमी आहे. देशात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि मराहाष्ट्रातील विदर्भाचा समावेश आहे. दक्षिण भारतात कर्नाटक आणि तेलंगनामध्येही गंभीर स्थिती आहे.
राज्यवार आकडेवारी पाहता उत्तर प्रदेशमध्ये नेहमीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस कमी पडला आहे. तर, मध्यप्रदेशमध्ये २० टक्के पावसाची कमी आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये २१ते २६ टक्के कमी पाऊस पडला आहे.