दारूच्या दुकानात माकड घुसलं आणि गटागटा दारू ढोसली, पाहा व्हिडीओ

दारूच्या दुकानात माकड घुसलं आणि मग काय झालं पाहा व्हिडीओ

Updated: Jul 14, 2021, 10:43 PM IST
दारूच्या दुकानात माकड घुसलं आणि गटागटा दारू ढोसली, पाहा व्हिडीओ title=

मंडला: माकड कधी काय करेल याचा नेम नाही. अनेक ठिकाणी खाण्याच्या गोष्टी पळवणारं माकड पाहिलं असेल पण एक माकड चक्क दारूच्या दुकानातच घुसलं. या माकडाने हद्दच केली. माकडाने चक्क घुकानात घुसखोरी केली. त्यानंतर एक दारूची बाटली घेतली. ही बाटली चालकानं त्याच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र माकडाने बाटली देण्यास विरोध केला. 

माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दारूच्या दुकानात घुसलेल्या माकडानं आपल्याला हवी ती दारूची बाटली उचलून धुमाकूळ केला. माकडाने आधी दारूची बाटली उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते. 

बिस्किटाचं आमिष दाखवून दारूची बाटली काढण्याचा प्रयत्न दुकानदारानं केला. मात्र माकडही हुशार निघालं. माकडाने बिस्किटाकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि दारूच्या बाटलीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

माकडाने दारूची बाटली उघडून त्यातली दारू गटगट ढोसली. इतकच नाही तर त्याने खाली सांडलेली दारूही चाटून गेली. ही घटना मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातील आहे. हा माकड या दुकानात रोज येत असल्याचंही सांगितलं जात आहे. 5 दिवसांपूर्वी या माकडाने दारूचे काही थेंब पडलेले चाखले आणि त्यालाही याची चटक लागली.