... म्हणून उद्या २ वाजता बंद होणार राष्ट्रपती भवन परिसरातील कार्यालयं

पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार

शैलेश मुसळे | Updated: May 29, 2019, 03:03 PM IST
... म्हणून उद्या २ वाजता बंद होणार राष्ट्रपती भवन परिसरातील कार्यालयं title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या परिसरात होणार आहे. यामुळे गुरुवारी राष्ट्रपती भवन परिसरातील सर्व कार्यालयं लवकर बंद होणार आहेत. कार्मिक मंत्रालयाने एक पत्र काढत नॉर्थ ब्लॉक, साउथ ब्लॉक, रेल भवन, वायु भवन, सेना भवन, डीआरडीओ आणि हटमेंट्समधील सरकारी कार्यालयं दुपारी २ वाजता बंद करण्याची सूचना दिली आहे. संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबतच अनेक खासदार मंत्रीपदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी आजपासूनच परदेशातील पाहुण्याचं आगमन सुरु होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात 'बे ऑफ बंगाल इनिशिएटीव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल एंड इकॉनॉमिक कोऑपरेशन'(BIMSTEC)म्हणजेच बिमस्टेकचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बिमस्टेकमध्ये भारतासोबतच बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटान देश सहभागी आहेत.