मुंबई : मोदी सरकारने जनतेसाठी एक नवीन स्पर्धा अमलात आणली आहे. जर तुमच्यामध्ये काही नवीन करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक सूवर्ण संधी असणार आहे. देशात बुलेट ट्रेनच्या चर्चा फारच रंगत आहेत. सरकार बुलेट ट्रेनला एक नवी ओळख देण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबई ते अहमदाबाद धावणाऱ्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने एका राष्ट्रीय स्पर्धेची घोषणा केली आहे.
२५ मार्च मार्च पर्यंत करू शकता अर्ज
या स्पर्धेसाठी स्पर्धकाला बुलेट ट्रेनसाठी नाव आणि एक मैस्कॉट डिझाईन करावा लारणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला सरकारकडून १ लाख रूपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे स्पर्धकांनी उत्तम रित्या मैस्कॉट डिझाईन केलेला हवा. NHSRCLच्या मूल्यव्यवस्थेमध्ये प्रोत्साहन आणि लोकांपर्यंत आपला संदेश पोहचवू शकेल. अशी अपेक्षा आहे.
Unleash the creative spirit in you and participate in the Logo and Mascot Contest for Mumbai-Ahmedabad High-Speed Rail. Win cash prizes up to Rs. 1,00,000. Visit: https://t.co/SYjQqGOHS0 pic.twitter.com/PavvDneahs
— MyGovIndia (@mygovindia) February 22, 2019
मैस्कॉ डिझाईनसाठी बक्षीस
मैस्कॉ डिझाईनच्या विजेत्याला १ लाख रूपयांचा बक्षीस देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ५ उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक उत्तेजनार्थ विजेत्याला १० हजार रूपयांचे बक्षीस असणार आहेत. ट्रेनच्या नावासाठी, विजेत्याला ५० हजार रूपये रोख बक्षीस आणि पाच उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून ५-५ हजार रुपये दिले जातील.