बंगळुरू : बंगळुरू येथे सुरू असलेल्या 'एरो इंडिया शो'दरम्यान आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. 'एरो इंडिया शो' सुरू असतानाच गेट क्रमांक ५ जवळ मोठी आग लागली. वाहनतळात लागलेल्या आगीत ३०० गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुक्या गवताच्या पेंडीला आग लागली आणि ती पसरल्याची माहिती समोर येत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Karnataka: According to the fire department, 80-100 cars gutted in fire near the venue of #AeroIndia2019 in Bengaluru pic.twitter.com/pwpTKDzIgT
— ANI (@ANI) February 23, 2019
बंगळुरूत बुधवारपासून 'एरो इंडिया शो' सुरू झाला. यापूर्वीही 'एरो इंडिया शो'दरम्यान सूर्यकिरण विमाने कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. 'एरो इंडिया शो'मध्ये लढाऊ विमानांचा थरार पाहता येतो. शोमध्ये अनेक लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके पाहता येतात. यावर्षी 'एरो इंडिया शो'मध्ये राफेल विमानांची प्रात्यक्षिकेही पाहता येणार असल्याने पाच दिवस चालणाऱ्या या शोबाबत मोठी उत्सुकता होती.