मोदी सरकारचा लालूप्रसादना दणका, ही सुविधा केली रद्द

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जोरदार दणका दिला. महागठबंधनमधून बाहेर पडून थेट भाजपला सोबत घेऊन पुन्हा सरकार स्थापन केले. आता तर केंद्रातील मोदी सरकारने लालूप्रसाद यादव यांनी मिळणारी विशेष सुविधा रद्द करत जोरदार दणका दिलाय.

Updated: Jul 28, 2017, 06:56 PM IST
मोदी सरकारचा लालूप्रसादना दणका, ही सुविधा केली रद्द title=

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जोरदार दणका दिला. महागठबंधनमधून बाहेर पडून थेट भाजपला सोबत घेऊन पुन्हा सरकार स्थापन केले. आता तर केंद्रातील मोदी सरकारने लालूप्रसाद यादव यांनी मिळणारी विशेष सुविधा रद्द करत जोरदार दणका दिलाय.

 राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांमागे भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. यावरुन लालू यांनी मोदी सरकारने आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोपही केला होता. मात्र, याच मोदी सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना व्हीआयपी सुविधा मिळत होती, ही बाब उघड झालेय.

 देशातील विमानतळांवर ३० प्रकारच्या व्हीआयपी श्रेणीतील व्यक्तींना विशेष सूट दिली जाते. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसारख्या लोकांचा समावेश असतो. या व्हीआयपींना एसपीजीची विशेष सुरक्षाही पुरवली जाते. याशिवाय त्यांना विमानापर्यंत जाण्यापर्यंत कोणत्याही सुरक्षेशिवाय ते विमानातही जाऊ शकतात. या सुविधाचा लाभ लालूप्रसाद यादव यांनी मिळत होता. तेही त्यांचे विशेष यादीत नाव नसतानाही. गेल्या शुक्रवारपासून लालूंना ही सुविधा काढून घेण्यात आलेय.

२००९ मध्ये यूपीए सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना ही सुविधा देण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यात ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीकडे (बीसीएएस) यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून ही सुविधा रद्द करण्यात आलेय.