Rapido चालकाचं मॉडेल सोबत घाणेरडं कृत्य, खाजगी ठिकाणी स्पर्श केल्याने गुन्हा दाखल

Rapido Driver : रॅपिडोच्या चालकारवर एका तरुणीने गंभीर आरोप केले आहेत.

Updated: Nov 16, 2022, 07:45 PM IST
Rapido चालकाचं मॉडेल सोबत घाणेरडं कृत्य, खाजगी ठिकाणी स्पर्श केल्याने गुन्हा दाखल title=

बंगळुरु : कॅब चालकांवर आतापर्यंत अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. ज्यामध्ये कंपनी तक्रारीनुसार कारवाई देखील करते. आता बंगळुरुमधून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. बंगळुरूमधील एका मॉडेलने रॅपिडोच्या एका गाडी चालकावर लैंगिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. 21 वर्षीय पीडित तरुणी ही डबिंग आर्टिस्ट आहे.

हेन्नूर पोलिसात तरुणीने मंजुनाथ टिप्स्वामी विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितले की, तिने जक्कूर ते बाबूसाबपल्या येथे रात्री 10.30 वाजता काम संपवून घरी जाण्यासाठी रॅपिडोवर बाईक बुक केली होती. ती बाईकवर बसल्यावर आरोपीने त्याचा फोन बंद असल्याचे सांगून ओटीपी नंबर घेतला नाही आणि तिला गाई़ड करण्यास सांगितले.

पीडिते तरुणीने यानंतर त्याला रस्ता सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने तिला मागून स्पर्श करण्यास सुरुवात केली. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. या तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 354 (ए) अंतर्गत लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आहे.