पणजी : गोव्यात शनिवारी दुपारी ट्रेनिंग मिशनसाठी रवाना झालेलं MiG-29K लढाऊ विमान उड्डाणाच्या काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या लढाऊ विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ट्रेनिंगसाठी या विमानाचं उड्डाण करण्यात आलं होतं.
Indian Navy Sources: A MiG-29K fighter aircraft crashed in Goa soon after it took off for a training mission. Both the pilots have managed to eject safely. The aircraft involved in the crash was a trainer version of the fighter jet. pic.twitter.com/nMWPYOeUFN
— ANI (@ANI) November 16, 2019
#UPDATE Navy Spokesperson Commander Vivek Madhwal: The MiG-29K trainer aircraft suffered an engine fire. The pilots Captain M Sheokhand and Lt Commander Deepak Yadav ejected safely. https://t.co/ArPwXBw8Kk
— ANI (@ANI) November 16, 2019
नौदल प्रवक्ता कमांडर, विवेक मधवाल यांनी सांगितलं की, मिग-२९के (MiG-29K) या प्रशिक्षणार्थी विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. आग लागल्यामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचं बोललं जात आहे. पायलट कॅप्टन एम.शोकंद आणि लेफ्टनंट कमांडर दीपक यादव यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. गोव्यातील आयएनएस हंसा येथून विमानाचं उड्डाण करण्याच आलं होतं.
नौदलाकडून अधिक तपास सुरु आहे.