मच्छी खाणाऱ्यांनो सावधान, रिसर्चमध्ये झाला मोठा खुलासा

तुम्ही मच्छी खाण्याचे शौकिन आहात? तर मग ही बातमी नक्की वाचा.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 29, 2017, 10:32 PM IST
मच्छी खाणाऱ्यांनो सावधान, रिसर्चमध्ये झाला मोठा खुलासा  title=
Representative Image

पणजी : तुम्ही मच्छी खाण्याचे शौकिन आहात? तर मग ही बातमी नक्की वाचा.

जापान आणि दक्षिण आशियातील देशांत माशांच्या पोटात मायक्रोप्लास्टिक आढळलं आहे. मात्र, भारतीय जलक्षेत्रात याचा प्रसार झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाहीये. एका संशोधकाने सांगितले की, भारतीय जलक्षेत्रात मायक्रोप्लास्टिक आहे की नाही याचा सोध लावण्यासाठी जापानच्या टोक्यो युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अॅन्ड टेक्नोलॉजीने एक संशोधन केलं आहे.

टोक्यो युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अॅड टेक्नोलॉजी (टीयूएटी) ने नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) सोबत शोध सुरु केला आहे. टीयूएटीच्या संशोधकांनी सांगितले की, ज्या-ज्यावेळी आपण मच्छी खातो त्यावेळी आपण प्लास्टिक खात असल्याची शक्यता आहे. संशोधनात समोर आलं आहे की, माशांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळलं आहे. त्यामुळे मच्छी खाणाऱ्याच्या शरीरातही हे प्लास्टिक जाण्याची शक्यता आहे.

तकादामधील एका टीमने केलेल्या संशोधनात आढळलं की, टोक्योच्या खाडीतील माशांच्या पोटात मायक्रोप्लास्टिक आढळलं आहे. जवळपास ८० टक्के माशांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळल्याचंही त्यांनी सांगितलं.