शौचालय नसल्याने जावयाचा सासरी जाण्यास नकार

सासरी शौचालय नसल्याने लग्न मोडल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, झारखंडमध्ये एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 29, 2017, 09:51 PM IST
शौचालय नसल्याने जावयाचा सासरी जाण्यास नकार title=
Representative Image

रांची : सासरी शौचालय नसल्याने लग्न मोडल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, झारखंडमध्ये एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

झारखंडमधील एका व्यक्तीने आपल्या सासरी जाण्यास नकार दिला आहे आणि त्याचं कारण म्हणजे शौचालय. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात राहणाऱ्या प्रमोद कुमार याचा जोगतियाबाद येथे राहणाऱ्या तरुणीसोबत विवाह झाला होता.

लग्न झाल्यानंतर प्रमोद कुमार एक दिवस आपल्या सासरी गेले होते. त्यावेळी त्यांनी सासरच्यांना शौचालय कुठं आहे असं विचारलं. यानंतर सासरच्यांनी प्रमोदला घरी शौचालय नसल्याचं सांगितलं. हे ऐकल्यानंतर प्रमोद कुमार यांना झटका बसला.

प्रमोद कुमार हे रागाने आपल्या घरी आले आणि त्यांनी आपल्या पत्नीलाही माहेरी जाण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत शौचालय बांधणार नाही तोपर्यंत तुमच्या मुलीला माहेरी पाठवणार नाही असेही प्रमोद यांनी ठरवलं आहे.

प्रमोदचे सासरे जगेश्वर पासवान यांनी सांगितलं, माझ्या घरी शौचालय नसल्याने माझा जावई नाराज आहे. जोपर्यंत शौचालय बांधणार नाही तोपर्यंत घरी येण्यासही त्यांनी नकार दिला आहे.