नवी दिल्ली : मेघालयचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार मुकुल संगमा यांनी दोन्ही विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
मुकुल संगमा यांनी अम्पती आणि सोंगसाक या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
मुकुल संगमा यांनी भाजप उमेदवार बकुल सी हजोंग यांचा ६,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. तर, सोंगसाक मतदारसंघातून एनपीएफ (नॅशनल पिपल्स पार्टी) उमेदवार एन डी शिरा यांचा १,३०० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. या मतदारसंघात भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहीली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांची पत्नी दिक्कांची डी शिरा यांनीही महेंद्रगंज मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप उमेदवार प्रेमानंद कोच यांचा ६,००० पेक्षाही अधिक मतांनी पराभव केला. ६० सदस्यांच्या मेघालय विधानसभेसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं.
मेघालय विधानसभेसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. यासाठी ७५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ३,०२५ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत ३६१ उमेदवारांचं भवितव्याचा फैसला होतोय.
विलियम नगर मतदारसंघात १८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवाती काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं निधन झाल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली.
राज्यातील १८ लाख मतदारांमध्ये ९ लाखांहून अधिक महिला तर ८.९६ लाख पुरुष मतदार आहेत. या राज्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. यंदाच्या निवडणुकीत जवळपास ८९,४०५ मतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.