Cooking Kitchen Tips Video : ना मैदा, ना साखरेचा पाक फक्त एक कप दुधात बनवा ही फेमस मिठाई...सोपी रेसिपी एकदा करूनच पाहा...

मैद्याशिवाय, माव्याशिवाय हेल्थी विकत मिळते  तशीच चवीला उत्तम अशी मिठाई घरच्या घरी बनवणं आता अगदी शक्य आहे, यासाठी एक कप दूध लागणार आहे बस्स ! 

Updated: Jan 7, 2023, 09:12 AM IST
Cooking Kitchen Tips Video : ना मैदा, ना साखरेचा पाक फक्त एक कप दुधात बनवा ही फेमस मिठाई...सोपी रेसिपी एकदा करूनच पाहा... title=

Cooking kitchen tips: आपल्याकडे गोड खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे.जेवताना किंवा जेवल्यानंतर काहीतरी गोडधोड खाण्याची इच्छा तुम्हाला कधीनाकधी होत असेलच प्रत्येकवेळी घरी काही खायला असेल असं नाही ना आणि बाहेरून आणणं म्हणजे एकतर पैसे वाया आणि

विकतचे पदार्थ म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक. मग अश्यावेळी घरच्या घरी काहीतरी बनवून ठेवण्याचे पर्याय असतात. एखादा गोडाचा पदार्थ घरी बववणे म्हणजे वेळखाऊ काम. त्यात लाडू सारखं काही बनवायचं म्हणजे, त्यासाठी पाक आला (sugar syrup) आणि तो सर्वाना जमतेच असं नाही.

आणि पाक म्हणजे साखरेचा अतिवापर त्यामुळे हेल्थी खाणारे (sugar is not good for health) अश्या पदार्थांसाठी नाकं मुरडतात त्यामुळे आज आपण आगळ्या वेगळ्या मिठाईची रेसिपी (how to make sweets at home) पाहणार आहोत ज्यात  साखरेचा पाक वापरायची गरजच नसणार आहे. आणि मावा सुद्धा वापरला नाही तरी ही मिठाई चवीला उत्तम लागते . चला जाणून घेऊया सोपी ही रेसिपी . (no sugar no maida mithai at home easy recipe in marathi)

दूधापासून तयार केलेली मिठाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य

  • 1 कप बेसन पीठ
  • 1 कप कोकोनट पावडर 
  • 1 कप तूप 
  • 1 कप काजू
  • 2 कप साखर 
  • 1 कप दूध 
  • वेलची पावडर चवीनुसार 

कृती

गॅसवर एक कढई ठेवा आता त्यात 1 कप बेसनाचं पीठ खरपूस भाजून घ्या, जस पीठ छान भाजू लागेल तेव्हा त्याचा खमंग असा सुगंध दरवळू लागेल ,बेसनाचं पीठ भाजताना लक्षात ठेवा गॅस मंद आचेवर असावा नाहीतर पीठ करपेल. आता पिठात कोकोनट पावडर घाला आणि १-२ मिनिट ते भाजून घ्या.   (smart kitchen tips) 

आता यात 1 कप तूप घाला आणि मिश्रण एकतर करून घ्या. आता हे मिश्रण पातळ व्हायला लागेल तेव्हा त्यात 1 कप काजूची पावडर घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकतर करून घ्या. (cooking tips) 1 कप दूध घाला आणि मिश्रण चांगलं शिजू द्या. 
तोवर दुसरीकडे बटर पेपर घ्या आणि त्यावर हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या बावरून बटर पेपरने झाकून ठेवा आणि रूम टेम्परेचरवर चांगलं 2-3 तास सेट होऊ द्या . 

स्वादिष्ट खायला उत्तम आणि हेल्थी अशी मिठाई बनून तयार मग याचे बारीक चौकोनी काप करा आणि सर्व्ह करा. या वीकेंडला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सर्वांची वाहव्वा मिळवा. (mawa maida free no sugar make one kg famous sweets at home cooking tips in marathi)