मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India (MSI) ने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने सांगितले की, कच्च्या मालाचा वाढीमुळे अंतिम उत्पादनांच्या किमतीत 4.3% पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
'मारूती सुझूकीच्या कारच्या किमती 1.7% नी वाढल्या आहेत. नवीन किमती 15 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत, अशी माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे.
मारुती सुझुकी इंडिया अल्टो ते एस-क्रॉसपर्यंत अनुक्रमे रु. 3.15 लाख आणि रु. 12.56 लाख किंमतीच्या कारची विक्री करते.
मागील वर्षी तीन वेळा वाहनांच्या किमतींमध्ये कंपनीने वाढ केली होती. दरम्यानच्या काळात ही चौथी वाढ असणार आहे.
कंपनीने जानेवारी, एप्रिल, जुलै आणि सप्टेंबरमध्ये फक्त हॅचबॅक स्विफ्ट आणि सर्व CNG प्रकारांच्या किमती वाढवल्या होत्या.
कार बनवण्यासाठी लागणाऱ्या पोलाद, अॅल्युमिनियम, तांबे, प्लास्टिक आणि मौल्यवान धातू यांसारख्या वस्तूंच्या किमती गेल्या वर्षभरात वाढल्यामुळे किमती वाढवणे भाग पडल्याचे कंपनीने गेल्या महिन्यात सांगितले.