ज्यूस विकून मुलाल बनवलं CRPF जवान, पुलवामामध्ये शहीद

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्या रतन ठाकूर शहीद झाले.

Updated: Feb 15, 2019, 01:57 PM IST
ज्यूस विकून मुलाल बनवलं CRPF जवान, पुलवामामध्ये शहीद title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दह दहशतवादी हल्ल्यात बिहारचा राहाणार जवान रतन ठाकूर शहीद झाले आहेत. जेव्हा जवानाच्या घरी ही बातमी कळाली तेव्हा त्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. मुलाच्या शहीद झाल्याची बातमी कळताच वडील निरंजन ठाकूर यांना आपले अश्रृ अनावर झाले. त्यांनी म्हटलं की, माझा एकच मुलगा होता ज्याला मी खूप प्रेमाने मोठं केलं होतं. निरंजन ठाकूर यांनी आपल्या मुलाला शिकवण्यासाठी रस्त्यावर ज्यूस विकला. रस्त्यावर कपडे देखील विकले. अतिशय हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी मुलाला मोठं केलं होतं. त्यांनी म्हटलं की, 'रतन अभ्यासात खूप हुशार होता. २०११ मध्ये तो सीआरपीएफमध्ये भरती झाला होता. पण दहशतवाद्यांनी त्याला मारलं. आता सगळं काही संपलं.' 

'रतन नोकरीला लागल्यानंतर गरीबी हळूहळू दूर होऊ लागली होती. सगळं काही व्यवस्थित होत होतं पण आता तो शहीद झाल्यानंतर आम्ही कोणाच्या आधारावर जगायचं.' असं निरंजन ठाकूर यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

रतन ठाकूर यांच्या पत्नी राजनंदनी यांनी म्हटलं की, 'रतन यांचा दुपारी १ वाजता फोन आला होता. श्रीनगरला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि रात्री फोन करतो असं म्हटलं. मी त्यांच्या फोनची वाट बघत होती. रात्री टीव्हीवर आम्हाला हल्ल्याची बातमी कळाली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या ऑफीसमधून फोन आला आणि ते शहीद झाल्याची माहिती मिळाली.' 

पिता निरंजन यांनी म्हटलं की, 'रतन यांची पत्नी गर्भवती आहे. फोनवर तो होळीला घरी येणार असं म्हणत होता. रतनला एक चार वर्षाचा मुलगा आहे. पण त्याला वडिलांच्या शहीद झाल्याची माहिती देखील नाही. वडील कामावर गेले आहेत. ते मला खेळणी आणणार आहे. असं तो चिमुकला बोलतोय.'