Marital Affair : पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्...

Extramarital Affairs :  एका धक्कादायक घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. विश्वासाला तडा जाणाऱ्या घटनेनंतर समाजातील नातेसंबंधाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत.पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्... 

नेहा चौधरी | Updated: Apr 29, 2023, 04:41 PM IST
Marital Affair : पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्... title=
Marital Affair Married women Affair with 15 year old boy Husband catches red handed crime news viral

Married women Affair with Boy : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात...प्रेमात ना रंग पाहिला जातो नाही धर्म...ना वय पाहिलं जातं ना पैसा...कुठलंही नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. प्रेमाचा पाया आहे विश्वास आहे. पती पत्नीमधील नात्याचा पाया हा विश्वास आणि प्रेम...यातील दोघांपैकी एकही जण घराबाहेर गेलं तर त्याला विश्वासाला आणि नात्याला तडा जातो. जो मनावर खोलवर घाव करतो. 

देशात गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे. कधी पुरुषाचं तर कधी स्त्रीचं कोणाचं ना कोणाचं अफेअरचं वृत्त आपल्याला वाचायला मिळतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित स्त्रीचं अफेअर सुरु होतं. नवऱ्याने पत्नीला नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्यावर त्याचा पायाखालची जमीनच सरकली. (Marital Affair Married women Affair with 15 year old boy Husband catches red handed crime news viral)

पत्नीचं असं अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे पतीला मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्या स्त्रीचं 15 वर्षीय मुलाशी अफेअर होतं. हे पाहून तर नवऱ्याचा संतापाचा पारा चढला. या महिलेला दोन मुलंही आहेत, त्यानंतर तिचं असं कृत्य संतापजनक आहे. 

राजा राणीचा सुखी संसार होता. नवऱ्याची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. एकादिवशी नवऱ्याने ऑफिसमधून लवकर निघून बायकोला सरप्राईज देण्याचं ठरवलं. बायकोला न सांगता तो अचानक घरी आला...पण पाहतो काय तर पत्नी एका तरुणासोबत नको त्या अवस्थेत त्याला दिसली. त्यांचा सुखी संसारात भूकंप आला. 

त्याने पत्नीला सगळ्याबद्दल विचारणा केली पण तिने सांगण्यास नकार दिला. अथक प्रयत्नानंतर तिने आपल्या त्या तरुणाशी नातेसंबंध असल्याचं तिने कबूल केलं. तब्बल दीड महिन्यांपासून त्या दोघांचे अनैतिक संबंध सुरु होते. धक्कादायक म्हणजे या घटनेच्या काही दिवसांपूर्वी नवरा मुलांसह आपल्या आई वडिलांकडे गावी गेला होता. तेव्हा पत्नी दोन दिवस त्या तरुणासोबत हॉटेलमध्ये जाऊन राहिली होती. 

पतीने पत्नीच्या मोबाईलची झाडाझडती घेतल्यावर त्यामध्ये पत्नी आणि त्या तरुणाचे अनेक अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्याला दिसले. या सगळ्या घटनेचा पतीवर खोल घातात झाला. पत्नीला कधी माफ न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. पत्नीची बदनामी होऊन नये म्हणून त्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंतही नेलं नाही. मात्र परिसरात या घटनेची चर्चा होते आहे. दरम्यान या घटनेनंतर पत्नीने तरुणाशी असलेलं अफेअर तोडलं आहे. ही घटना हरियाणामधील आहे.