मराठी साहित्य संमेलनासाठी बडोदा नगरी सज्ज

91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आज बडोदा नगरी सज्ज झालीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 16, 2018, 10:54 AM IST
मराठी साहित्य संमेलनासाठी बडोदा नगरी सज्ज title=

बडोदा : 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आज बडोदा नगरी सज्ज झालीय. महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत हे संमेलन होतंय.. महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या डी. एन. हॉल मैदानावर ही साहित्यनगरी उभारण्यात आली आहे. 

राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड स्वागताध्यक्ष

श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड स्वागताध्यक्ष आहेत. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडणाराय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी चार वाजता या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.