लग्न न जमणारे आणि ज्यांचं जोडीदाराशी पटत नाही, ते उचलताहेत हे धक्कादायक पाऊल

एका धक्कादायक अहवालानुसार, लोक आपल्या जोडीदाराशी मतभेद झाल्यानंतर घटस्फोट घेण्यापेक्षा जास्त आत्महत्या करीत आहेत. इतरही अनेक धक्का गोष्टी या आकडेवारीतून समोर आल्या आहेत.

Updated: Nov 16, 2021, 01:05 PM IST
लग्न न जमणारे आणि ज्यांचं जोडीदाराशी पटत नाही, ते उचलताहेत हे धक्कादायक पाऊल title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : भारत हा जगातील असा देश आहे जिथे लग्नाला सर्वाधिक आणि सामाजिक महत्व दिले जाते आणि आकडेवारीही याला समर्थन देते. 'UN वुमनच्या प्रोग्रेस ऑफ द वर्ल्ड्स वुमन'च्या अहवालानुसार, जगाच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण सर्वात कमी आहे. 2010 पर्यंत, 45-49 वयोगटातील केवळ 1.1 टक्के महिला घटस्फोटित होत्या. तथापि, याचा अर्थ असा नाही की जे लोक वैवाहिक जीवन जगत आहेत ते आनंदी आहे. यासंदर्भात नुकतीच समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. या अहवालात काय म्हटले आहे ते जाणून घेऊया.

NCRBचा अहवाल

नुकताच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार अलीकडच्या काही वर्षांत घटस्फोट घेण्यापेक्षा दु:खी विवाहित लोक आत्महत्या करीत आहेत. भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांनुसार, 2016 ते 2020 दरम्यान वैवाहिक समस्यांमुळे सुमारे 37,591 लोकांनी आत्महत्या केली आहे. 'लग्नाशी संबंधित समस्यांमुळे' आत्महत्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे.

हुंड्यामुळे आत्महत्या

हुंड्यामुळे 10,282 आत्महत्या झाल्या आहेत, तर 10,584 मृत्यू लग्न न जमत असल्यामुळे झाल्या आहेत. हुंड्यामुळे दरवर्षी सरासरी 2,056 आत्महत्या झाल्या आहेत, तर लग्न न जमनाऱ्यांची संख्या दरवर्षी 2,100 इतकी होती.

हवालानुसार, विवाहाशी संबंधित समस्यांमुळे पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेषत: हुंड्यासंबंधीच्या प्रकरणांमध्ये महिलांच्या आत्महत्या अधिक झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत हुंडाबळीमुळे 9 हजार 385 महिलांनी आत्महत्या केल्या आहेत.