राहुल गांधींकडे कॉंग्रेसचे नेतृत्व ही काळाजी गरज : मनमोहन सिंह

सध्याच्या राजकीय परिस्थितीत राहुल गांधींकडे काँग्रेसची सूत्रे येणे ही काळाजी गरज आहे. राहुल यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस जातीय वादी पक्षांपासून देशाला दूर ठेवेल. तसेच, कॉंग्रेस पुन्हा एकदा नव्या दमाने प्रतिष्ठेची उंची गाठेल, असे मत देशाचे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 16, 2017, 04:27 PM IST
राहुल गांधींकडे कॉंग्रेसचे नेतृत्व ही काळाजी गरज : मनमोहन सिंह title=

नवी दिल्ली : सध्याच्या राजकीय परिस्थितीत राहुल गांधींकडे काँग्रेसची सूत्रे येणे ही काळाजी गरज आहे. राहुल यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस जातीय वादी पक्षांपासून देशाला दूर ठेवेल. तसेच, कॉंग्रेस पुन्हा एकदा नव्या दमाने प्रतिष्ठेची उंची गाठेल, असे मत देशाचे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी पक्षाला नवी उमेद देतील

राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे आज (शनिवार) अधिकृतरित्या स्विकारली. कॉंग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना मनमोहनसिंह म्हणाले, देश सध्या ज्या आर्थिक, सामाजीक परिस्थितीमधून जात आहे. तसेच, आव्हानांचा सामना करत आहे अशा स्थितीत कॉंग्रेसला राहुल गांधी यांचे नेतृत्व मिळणे आवश्यक होते. राहुल गांधी हे आपली जबाबदारी मोठ्या उत्साहाने आणि जोमाने सांभाळतील. तसेच, पक्षाला नव्या उंचीवर घेऊन जातील, असेही मनमोहनसिंह म्हणाले.

सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस बळकट

या वेळी बोलताना मनमोहन सिंह यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कार्याचेही कौतूक केले. ते म्हणाले सोनिया गांधी यांनी देशातील एकात्मता आणि मजबूती कायम राहण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. गेल्या 20 वर्षात सोनियांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस अधिक बळकट होत गेली. पंतप्रधान म्हणून काम करताना अनेकदा सोनिया गांधींनी दिलेल्या सल्ल्याचा निर्णय घेताना फायदा झाला. त्यांच्या दूरदृष्टीतून मनरेगा सारख्या योजना राबवता आल्या असेही मनमोहनसिंह म्हणाले.

क्रोधाचे राजकारण प्रेमाने जिंकू

दरम्यान, पक्षाची सूत्रे हाती घेतल्यावर पक्षकार्यकर्त्यांना संबोधिक करताना राहुल गांधी म्हणाले, मी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वास देतो की, येत्या काळात आपला आवाज संपूर्ण देशातून ऐकू येताना दिसेल, आपण एका कुटुंबातले आहोत. मी युवकांना सांगू इच्छितो की, आपण प्रेमाचा, बंधुभावाचा हिंदूस्थान निर्माण करू. आक्रमक आणि क्रोधाने भरलेल्या राजकारणासोबत आपली लढाई आहे. पण ही लढाई आपण प्रेमाच्या बळावर जिंकू. मला माहित आहे माझा कार्यकर्ता कठोर मेहनत आणि घाम गाळून कॉंग्रेसची विचारधारा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतो. या कार्यकर्त्याचा विश्वास सांभाळने ही माझ्यावरची मोठी जबाबदारी आहे. आपला आवाज संपूर्ण देशात पोहोचेल आणि लोकही तो ऐकतील. भाजपजवळ जगातील सर्वात जूनाट विचार आहे. ते कॉंग्रेसमुक्त भारत निर्माण करू पाहतात. भाजपवाले स्वत:साठी लढत आहेत. आपण (कॉंग्रेस) नवा भारत निर्माण करू.