मंगळसूत्राबाबतची अफवा महिलांमध्ये पसरली आणि...

मंगळसूत्र हे पत्नीसाठी सौभाग्याचं लेणं मानलं जातं. मात्र हेच मंगळसूत्र आपल्या पतीसाठी घातक असल्याची अफवा पसरली आणि महिलांनी आपली मंगळसूत्रे तोडून फेकण्यास सुरुवात केली. 

Updated: Jul 7, 2017, 01:25 PM IST
मंगळसूत्राबाबतची अफवा महिलांमध्ये पसरली आणि... title=

बंगळूरु : मंगळसूत्र हे पत्नीसाठी सौभाग्याचं लेणं मानलं जातं. मात्र हेच मंगळसूत्र आपल्या पतीसाठी घातक असल्याची अफवा पसरली आणि महिलांनी आपली मंगळसूत्रे तोडून फेकण्यास सुरुवात केली. 

बंगळूरुमध्ये अशीच एक अजब घटना समोर आलीये. खरतर अशी अफवा पसरवण्यात आली की ज्यांनी लाल मणी असलेली मंगळसूत्र घातलीये त्यांच्या पतींना धोका आहे. इतकंच नव्हे तर हे मणी त्यांच्या पतीसाठी घातक ठरु शकतात.

दरम्यान, ही अफवा कोणी पसरवली याबाबत कोणतीच माहिती नाही. मात्र मंगळवारी रात्री ही अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत महिलांनी मंगळसूत्रातील लाल मणी फोडण्यास सुरुवात केली. अनेकांनी तर मंगळसूत्रे काढून ठेवणेच पसंत केले. 

कर्नाटकच्या सहा जिल्ह्यांमध्ये आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरील काही राज्यांमध्ये ही अफवा तुफान पसरली. अखेर राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास कल्याण विभागाने याबाबतचे पत्रक जारी केले. तसेच हे खरे नसून निव्वळ अफवा आहे असे पत्रकात म्हटलेय. तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरवल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.