धोनीच्या क्रिकेटमधून निवृत्तीबाबत धोनीच्या मॅनेजरचं मोठं वक्तव्य

धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

Updated: Jul 19, 2019, 07:50 PM IST
धोनीच्या क्रिकेटमधून निवृत्तीबाबत धोनीच्या मॅनेजरचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. वर्ल्डकपनंतर धोनी निवृत्ती जाहीर करेल असं अनेकांना वाटत आहे. पण धोनीचे मित्र आणि मॅनेजर अरूण पांडे यांनी या चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम देण्याचं काम केलं आहे. शुक्रवारी त्यांनी म्हटलं की, भारतीय विकेटकीपर धोनीचा निवृत्तीबाबत अजूनही कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे.

भारताचा सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. पांडे यांनी म्हटलं की, 'धोनीने निवृत्तीबाबत अजून कोणतीही योजना बनवलेली नाही. त्याच्या सारख्या महान खेळाडूच्या भविष्याबाबत सुरु असलेल्या चर्चा दुर्भाग्यपूर्ण आहे.'

पांडे यांची ही प्रतिक्रिया रविवारी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियांची घोषणा होण्याआधी आली आहे. त्यामुळे आता धोनीला संधी मिळते का नाही हे पाहावं लागेल. बीसीसीआय आता काय निर्णय घेणार ही येणारी वेळच सांगेल. 

अरुण पांडे हे अनेक दिवसांपासून धोनीसोबत आहेत. धोनीचं काम देखील ते बघतात. वर्ल्डकपनंतर धोनीवर टीका देखील होत आहे. धोनीने आता निवृत्ती घ्यावी असं काही माजी क्रिकेटर्सने म्हटलं आहे, तर धोनी अजूनही खेळू शकतो असं देखील काही खेळाडूंचं म्हणणं आहे. धोनीच्या नेतृत्वात टीमने वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियंस ट्रॉफी जिंकली आहे.