इस्री करण्यासाठी चक्क गॅस सिलिंडरचा वापर...असा जुगाड कधी पाहिलाय?

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कपडे इस्री करताना दिसत आहे. यासाठी तो कोळसा किंवा वीज वापरत नाही, तर कपडे इस्री करण्यासाठी एलपीजी गॅस वापरत आहे.  

Updated: May 23, 2022, 10:48 AM IST
इस्री करण्यासाठी चक्क गॅस सिलिंडरचा वापर...असा जुगाड कधी पाहिलाय? title=

मुंबईः सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ असे असतात की, लोक हैराण होतात. सध्या असाच एक व्हिडिओ लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एलपीजी गॅस सिलिंडरने कपडे इस्त्री करताना दिसत आहे. हे पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. इतकंच काय पण व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीलाही धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कपडे इस्री करत आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो कोळसा किंवा वीज वापरत नाही, तर कपडे प्रेस करण्यासाठी तो एलपीजी गॅस वापरत आहे. व्हिडीओ बनवणारी व्यक्ती सुद्धा या इस्री करणाऱ्या व्यक्तीला विचारताना दिसत आहे की हा शोध कसा लागला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BrainChod (@brainchod)

त्याचवेळी कपडे इस्री करणारी व्यक्ती याबाबत काहीच माहिती नसल्याचे उत्तरात सांगत आहे. गेल्या 4 वर्षांपासून तो असेच कपडे प्रेस करत आहे.  तुम्ही पाहू शकता की त्या माणसाने थेट सिलिंडरला पाईप लावला आहे आणि तो त्याच्या प्रेसमध्ये बसवला आहे. मात्र इस्री गरम कशी होते हे मात्र समजत नाही. 

हा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हजारो लोकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून एका यूजरने सांगितले की, हे तंत्र खूप जुनं आहे.

हे तंत्र फार पूर्वीपासून अनेक ठिकाणी वापरले जात आहे. त्याच वेळी, बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की प्रेसमध्ये उष्णता कोठून येत आहे. अनेक लोक याला बनावटही म्हणत आहेत