बापरे! पोटात दडवलं 42 लाखांचं सोनं, विमानतळावर असा झाला खुलासा

सोन्याच्या तस्करीचा हा प्रकार पाहून कस्टम अधिकारीही आश्चर्यचकीत झाले    

Updated: Sep 29, 2021, 06:40 PM IST
बापरे! पोटात दडवलं 42 लाखांचं सोनं, विमानतळावर असा झाला खुलासा title=

नवी दिल्ली : सीआयएफएफ (Central Industrial Security Force) आणि कस्टम्स अधिकाऱ्यांनी (Customs) इम्फाळ विमानतळावर (Imphal Airport) एका मोठ्या तस्कराला अटक केली आहे. हा तस्कर 900 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या सोन्याची तस्करी करत होता ज्याची किंमत सुमारे 42 लाखांहून अधिक आहे. या तस्काराने हे सोनं चक्क पोटाच्या गुदाशयात लपवून ठेवलं होतं. 

सोन्याच्या तस्करीत पकडलेला आरोपी इम्फाळहून दिल्लीला जाणार होता. त्याने त्याच्या पोटाच्या गुदाशयात सुमारे 900 ग्रॅम वजनाची सोन्याची पेस्ट लपवली होती. तपासादरम्यान पोलिसांना या इसमाचा संशय आला. तपासादरम्यान सीआयएसएफ आणि कस्टम अधिकाऱ्यांना त्याच्या गुदाशयात सुमारे 908.68 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पेस्टची चार पाकिटं सापडली.

मोहम्मद शरीफ असं अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचं नाव आहे. आरोपी केरळमधील कोझिकोडचा (Kozhikode in Kerala) रहिवासी असून विमानाने इम्फाळहून तो दिल्लीला रवाना होणार होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की आरोपीला संशयावरुन सुरक्षा चाचणीसाठी नेण्यात आलं होतं,तिथे तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्या शरिराचा एक्स-रे काढण्यात आला. यावेळी एक्स-रेत धक्कादायक बाब समोर आली. आरोपीने सोन्याच्या तस्करीचा गुन्हा कबुल केला असून पुढील कारवाईसाठी त्याला कस्टम आणि सीआयएसएफकडे सोपवण्यात आलं आहे. 

इन्फाळमध्ये सोन्याच्या तस्करीची ही घटना नवीन नाही. याआधी 18 जूनला इम्फाळमधून अज्ञात वाहनात 43 किलो सोने जप्त करण्यात आलं होतं, ज्याची किंमत सुमारे 21 कोटी होती. यामध्ये 260 सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली होती.