खासदाराच्या कारचालकाची मुजोरी, 3 किलोमीटर फरफटत नेलं अन्... पाहा धक्कादायक Video

Man Dragged On Car Bonnet: बिहारच्या नवादा खासदाराच्या वाहनाच्या चालकाने दिल्लीत खळबळ उडवून दिली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खासदारांच्या (MP Chandan Singh) गाडीच्या बोनेटला एक माणूस लटकलेला दिसत आहे. 

सौरभ तळेकर | Updated: May 1, 2023, 01:31 PM IST
खासदाराच्या कारचालकाची मुजोरी, 3 किलोमीटर फरफटत नेलं अन्... पाहा धक्कादायक Video title=
Man Dragged on car bonnet

Delhi Man Dragged On Car Bonnet: दिल्लीतील गुन्हेगारी (Delhi Crime) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे. दिल्लीच्या विविध भागातील व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. अशातच बिहारच्या नवादा खासदाराच्या वाहनाच्या चालकाने दिल्लीत खळबळ उडवून दिली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खासदारांच्या (MP Chandan Singh) गाडीच्या बोनेटला एक माणूस लटकलेला दिसत आहे. बोनेटवर बसलेल्या माणसाला पाहूनही ड्रायव्हर गाडी चालवत राहतो. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं पहायला मिळतंय. (Man Dragged on car bonnet for three km in Delhi by MP Chandan Singh Driver Video Goes Viral)

रविवारच्या मध्यरात्रीची घटना. पोलिसांची गाडी नेहमीप्रमाणे जागता पहारा देत असताना त्यांना एक कार दिसली. कार नंबर BR 25 PA 2935...  कारला एक तरुण लटकत असल्याचं दिसलं. पोलिसांनी गाडी थांबण्यास सांगितली. तोपर्यंत या तरुणाला चालकाने 3 किलोमीटरपर्यंत फरफटत (Man Dragged On Car bonnet) नेलं होतं. अपघाताच्या वेळी खासदार गाडीत उपस्थित नव्हते, त्यांचा चालक गाडी चालवत होत, अशी माहिती समोर आली आहे. बिहारचे लोकसभा खासदार चंदन सिंह यांची ही गाडी होती.

आणखी वाचा - IPL 2023: 'तुला लाज वाटत नाही का?' अन् सर्वांसमोर इशांतने अक्षरला झाप झाप झापलं; पाहा Video

एका कारने माझ्या कारला तीन वेळा जोरदार धडक दिली.आश्रमजवळ पोहोचल्यावर हा प्रकार घडला. मग मी माझ्या गाडीतून बाहेर आलो आणि त्याच्या जाब विचारला. मी गाडीसमोर उभा होतो. त्यानंतर त्याने  गाडी सुरू केली आणि मी गाडीच्या बोनेटला लटकलो. आश्रम चौक ते निजामुद्दीनपर्यंत (Ashram Chowk to Nizamuddin) गाडीच्या बोनेटला लटकत होतो, अशी माहिती पिडीत व्यक्तीने पोलिसांना दिली आहे.

पाहा Video 

दरम्यान, ड्रायव्हर रामचंद कुमार (Driver Ramchand Kumar) असं या आरोपीचं नाव आहे. मी त्याच्या गाडीला धक्काही लावला नाही. आमच्या दोघांच्या गाडीवर कोणताच भाग मोडला नाही. त्याने माझी गाडी जबरदस्तीने अडवण्याचा प्रयत्न केला आणि बोनटवर उडी मारली, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केलीये.