गर्लफ्रेंडला बॅण्डस्टॅण्डला घेऊन गेला, नंतर केली शरीरसुखाची मागणी, तिने नकार देताच...

Crime In Mumbai: प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 2, 2023, 04:48 PM IST
गर्लफ्रेंडला बॅण्डस्टॅण्डला घेऊन गेला, नंतर केली शरीरसुखाची मागणी, तिने नकार देताच...  title=
Man brutally assaults girlfriend at Bandra Bandstand after she denies to have sex

Mumbai Crime News: मुंबईतही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमी युगुलांचे आवडते ठिकाण असलेल्या वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड
परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. बुधवारी ३१ मे रोजी ही घटना घडली आहे. शारीरिक सुखाची मागणी नाकारल्याने संतापाच्या भरात प्रियकराने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. 

आरोपी तरुणाचे नाव आकाश मुखर्जी असे आहे. त्याचे आणि तरुणीचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि कल्याण येथे राहणारे होते. दोघेही बुधवारी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी येथे फिरुन आल्यानंतर ते संध्याकाळी वांद्रे येथील बँण्डस्टँण्ड येथे आले होते. 

तिथे पोहोचल्यावर तरुणाने पीडित तरुणीला लग्नासाठी विचारले होते. पीडित तरुणीसाठी त्याने धर्मांतर केलं असल्याचंही त्याने म्हटलं होतं. हिंधू धर्म सोडून मी मुस्लीम धर्म स्वीकारला, असंही तो म्हणाला, तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत असा दावा केला आहे. तसंच, धर्मपरिवर्तनाचे प्रणाणपत्र दाखवून तुझ्या काकीकडून लग्नासाठी परवानगी घेऊ, असंही त्याने म्हटल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. 

रात्री दहाच्या सुमारास पीडित तरुणीने घरी जाण्याचा हट्ट धरला. मात्र, तिने घरी जाण्याचं नाव काढताच त्याचे वर्तन बदलले. त्याने तिला आणखी थोडा वेळ थांबण्यास सांगितले. त्यानंतर तिने जेव्हा कारण विचारले तेव्हा त्याने आपण आता शारीरिक संबंध ठेवूया, नंतर मी तुला घरी सोडेन, असं म्हटलं. परंतु घाबरलेल्या तिने त्याला नकार दिला व रडू लागली. 

पिडीत तरुणीने नकार देताच आकाशने तिचा गळा आवळला. तिने आरडा-ओरडा करायचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिचे तोंड दाबले व डोके जमिनीवर आपटले. तसंच तिला गटारात बुडवण्याचाही प्रयत्न केला. तरुणीने मदतीसाठी जोर जोरात आरडाओरडा केल्यानंतर तिथे असलेले स्थानिक धावत आले. पण आकाशने त्यांना मी सतत खडकांवरुन पडतोय, असं खोटं सांगितले. 

आकाशने त्यांना खोटे सांगून परत जाण्यास सांगितले. मात्र, तरुणीने त्यांना तो खोटं बोलत असून मला माराहण करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने समुद्राच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पम स्थानिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. 

स्थानिकांनी पीडित तरुणीला हात देत तिथून बाहेर काढले. तसंच, रिक्षा पकडून तिला भाभा रुग्णालयात दाखल केले. तरुणीच्या नाकाला आणि डोळ्याला दुखापत झाली आहे. परंतु, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तसंच, पोलिसांनी आकाश मुखर्जीला अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.