कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ममता बॅनर्जींच्या सरकारनं परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकराल्यानं संघानं ममता सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सरकारी मालकीच्या एका सभागृहात संघानं कार्यक्रम आयोजित केला होता. पण सुरक्षेच्या दृष्टीनं ऐन वेळी कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. असे प्रकार वारंवार घडत असल्याचं संघाचं म्हणणं आहे. खरंतरं कार्यक्रमासाठी सभागृह जूनमध्ये आरक्षित करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात अचानक सभागृहाच्या डागडुजीचं कारण देऊन परवानगी नाकरण्यात आली होती. ममता बॅनर्जींवर गेल्या काही महिन्यात तुष्टीकरणाच्या राजकारणाचे आरोप होत आहे. सरकारनं हा निर्णय घेतल्यानं संघाच्या आरोपांना आणखी बळ मिळालं आहे.