बांगलादेशी घुसखोरप्रकरणी ममता बॅनर्जींचा दुटप्पीपणा

आसाममध्ये NRCच यादी लागू झाल्यानंतर ममता बॅनर्जींना बांगलादेशी घुसखोरांचा पुळका आल्याची चर्चा आहे.  

Updated: Aug 2, 2018, 03:41 PM IST
बांगलादेशी घुसखोरप्रकरणी ममता बॅनर्जींचा दुटप्पीपणा title=

नवी दिल्ली : NRC च्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जींचा दुटप्पीपणा समोर आलाय.... आसाममध्ये NRCच यादी लागू झाल्यानंतर ममता बॅनर्जींना बांगलादेशी घुसखोरांचा पुळका आल्याची चर्चा आहे.  NRC चा हा मसुदा देशाचं विभाजन करणारा आहे, अशी ओरड ममता बॅनर्जी करतायत.... पण याच ममता बॅनर्जींचं बरोब्बर याच्या विरोधातलं रुप २००५ साली पाहायला मिळालं होतं.  २००५ साली याच बांगलादेशींच्या घुसखोरींच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जींनी लोकसभेत अधक्ष्यांवर कागद फेकले होते.

भूमिका बदलली 

घुसखोर हे पश्चिम बंगालमधलं सगळ्यात मोठी डोकेदुखी असल्याचं सांगत राजीनामा देण्याची तयारीही दाखवली होती. आता मात्र पंतप्रधानांच्या खुर्ची डोळ्यासमोर ठेवत ममतांनी त्यांची भूमिका ३६० अंशांत बदललीय.