लेफ्टवर Chapati hacks: आपल्याकडे रोजच्या जेवणात गव्हाची पोळी खाणारे आहेतच, क्वचितच कोणी असतील जे चपाती खात नसतील पण अनेकदा असं होतं की घरात एक्सट्रा चपात्या लाटल्या जातात आणि कोणी खाल्ल्या नाहीत तर त्या उरतात (cooking tips) आणि मग उरलेल्या चपात्यांचं काय करायचं ? हा मोठा प्रश्न गृहिणींना पडतो. (kitchen hacks) बरं शिळ्या चपात्या खाताना नाकं मुरडली जातात.
अन्न हे पूर्णब्रह्म मानलं जात, थोर मोठी मानस सांगतात अन्न कधीच फेकून देऊ नये अन्नाचा अपमान करू नये ताटात वाढलेलं संपूर्ण अन्न हे संपवून टाकाव. पण बऱ्याचदा आपल्याकडून हि चूक होते. जेवण पूर्ण खाल्लं जात नाही किंवा न खाल्ल्यामुळे जेवण उरत आणि मग उरलेलं जेवण फेकून दिलं जात...
तुम्हाला माहितीये का उरलेल्या चपात्यांपासून एक भन्नाट वेगळा टेस्टी त्याचसोबत हेल्दी नाश्ता तयार तुम्ही तयार करू शकता, आणि गंमत म्हणजे एरव्ही चपातीला नाक मुरडणारी लहान मूलं हा नाश्ता मात्र आवडीने खातील.
हा नाश्ता बनवण्यासाठी तुमचा फार वेळ सुद्धा जाणार नाहीये. झटपट अवघ्या 15 मिनिटात तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया रोटी बॉल्स बनवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचंय ?
रोटी बॉल्स बनवण्यासाठी उरलेल्या चपात्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्या एका भांड्यात हे तुकडे घाला त्यात चार ते पाच मोठे चमचे पाणी घालून ते भिजू द्या, वेगळ्या भांड्यात कांदा किसून घ्या.
त्यात शिमला मिरची गाजर कोथिंबीर मीठ लाल तिखट आणि काली मिरी पावडर घालून चांगलं एकजीव करून घ्या भिजलेली चापटी मध्ये हे सर्व मिश्रण घाला आणि चपातीचज्या पिठाप्रमाणे मळून घ्या, या नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि तेलात ब्राऊन होईपर्यंत टाळून घ्या...
एरव्ही चपाती पाहून दूर पळणारी लहान मुलं हे रोटी बॉल्स एका फटक्यात फस्त करून टाकतील आणि इतकंच काय आणखीसुद्धा मागतील...या निमित्ताने उरलेल्या चपात्या फेकण्याची वेळीसुद्धा आणि मुलांना एक हेल्दी नाश्तासुद्धा मिळेल आणि या सर्वात तुमचा वेळी वाचेल...करा आणि आम्हाला कळवायला विसरू नका..