महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार

काश्मीरमधून ३७० अनुच्छेद रद्द होताच आता एमटीडीसी काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार आहे. 

Updated: Aug 6, 2019, 05:42 PM IST
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : काश्मीरमधून ३७० अनुच्छेद रद्द होताच आता एमटीडीसी काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार आहे. काश्मीरचं हे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आता जास्तीत जास्त पर्यटक येतील. कारण काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटताच पर्यटन व्यवसाय आणखी बहरणार आहे. त्यादृष्टीनं पहिलं पाऊल एमटीडीसीनं उचललं आहे. 

एमटीडीसी जम्मू - काश्मीर आणि लडाखमध्ये रिसॉर्ट बांधणार आहे. सध्या फक्त महाराष्ट्रातच एमटीडीसीची रिसॉर्टस आहेत. पण आता हा पसारा विस्तारत एमटीडीसी थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचणार आहे.

काश्मिरमधलं अनुच्छेद ३७० रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख भागांत एमटीडीसी जमीन विकत घेणार आहे. तिथे रिसॉर्टस सुरू झाली की पर्यटकांची स्वस्त दरांमध्ये काश्मीरमध्ये राहण्याची सोय होणार आहे.