Mahaparinirvan Din 2023 : बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील शेवटचे 24 तास कसे होते? पाहा संपूर्ण घटनाक्रम!

Mahaprinirvan Din 2023: बाबासाहेब 5 डिसेंबर 1956 रोजी दुपारी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकाची प्रस्तावना लिहीत होते. साडेबारा वाजता माईसाहेबांनी बाबासाहेबांना जेवणासाठी बोलावले अन्...

सौरभ तळेकर | Updated: Dec 5, 2023, 10:17 PM IST
Mahaparinirvan Din 2023 : बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील शेवटचे 24 तास कसे होते? पाहा संपूर्ण घटनाक्रम! title=
Dr Babasaheb ambedkar, mahaprinirvan din 2023

Mahaparinirvan Din 2023 : समाजातील दुर्बल घटकांचे रक्षणकर्ते बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झालं. बाबासाहेबांना डायबिटीज, ब्लडप्रेशर, न्यूराइटिस आणि आर्थराइटिस यांसारख्या आजाराने ग्रासलं होतं. मधुमेहामुळे त्यांचं शरीर अशक्त झालं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर म्हणजेच माईसाहेब शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांच्या सोबत होत्या. त्यांनी त्यांच्या चरित्रात त्यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सविस्तर लिहिलं आहे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांचे सहकारी असलेले चांगदेव खैरमोडे यांनी त्यांच्या अंतिम क्षणाबद्दल त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील शेवटचे 24 तास कसे होते पाहुया...

मृत्यूच्या एक दिवस आधी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी बाबासाहेब सकाळी 8.30 वाजता उठले आणि चहा घेऊन माईसाहेब त्यांच्या खोलीत गेल्या. दोघांनी एकत्र चहा प्यायला. दरम्यान ऑफिसला जाणारा नानकचंद रत्तू त्यांच्याकडे आला आणि नानकचंदही चहा पिऊन निघून गेला. त्यानंतर माईसाहेबांनी बाबासाहेबांना त्यांची रोजची सकाळची कामे पूर्ण करण्यात मदत केली. 

माईसाहेबांनी त्यांचा ब्रेकफास्ट टेबलवर आणला. त्यानंतर बाबासाहेब, माईसाहेब आणि डॉ. मालवणकर हे तिघंजण एकत्र नाश्ता करून बंगल्याच्या व्हरांड्यात बसून एका विषयावर संभाषण करू लागले. बाबासाहेब वृत्तपत्रे वाचत होते, त्यानंतर माईसाहेबांनी त्याला औषधे आणि इंजेक्शन दिलं आणि नंतर ते काम आटोपून स्वयंपाकघरात गेले. बाबासाहेब आणि डॉक्टर मालवणकर व्हरांड्यात बसून बोलत राहिले. 

बाबासाहेब 5 डिसेंबर 1956 रोजी दुपारी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकाची प्रस्तावना लिहीत होते. साडेबारा वाजता माईसाहेबांनी बाबासाहेबांना जेवणासाठी बोलावले. त्यावेळी बाबासाहेब वाचनालयात बसून वाचन-लेखन करत होते. बाबासाहेब दुपारचे जेवण घेऊन झोपायला गेले तेव्हा माईसाहेब पुस्तक खरेदीसाठी बाजारात गेल्या. रात्री आठ वाजता जैन धर्मगुरू आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी बौद्ध आणि जैन धर्माविषयी चर्चा केली. बाबासाहेबांची मनःस्थिती चांगली असायची तेव्हा ते बुद्धाची पूजा करायचे आणि कबीरांचे दोहे पाठ करायचे, असं माईसाहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. 

रात्रीच्या जेवणाच्या वेळी बाबासाहेबांनी थोडे जेवण केलं. 'चलो कबीर तेरा भवसागर डेरा' ही कबीरांची जोडगीत त्यांनी गायलं अन् काठीच्या साहाय्याने बेडरूमच्या दिशेने गेले. त्यानंतर त्यांनी एम. जोशी आणि आचार्य अत्रे यांना पत्र लिहिली. बुद्ध आणि त्यांचा धम्म याची प्रस्तावनेवर काम केल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री साडे आकरा वाजता झोपायला गेले अन् बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. 6 डिसेंबर 1956 रोजी माईसाहेब नेहमीप्रमाणे बाबासाहेबांना उठवण्यासाठी गेल्यावर प्राणज्योत मावळलल्याची सर्वांना समजलं. नानकचंद रत्तू यांनी आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची माहिती दिली.