सर्वाधिक महिला न्यायाधीशांमध्ये मद्रास उच्च न्यायालय अव्वल...

इतिहासात पहिल्यांदाच महिला न्यायाधिशांची संख्या 10 वर

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 2, 2017, 12:09 PM IST
सर्वाधिक महिला न्यायाधीशांमध्ये मद्रास उच्च न्यायालय अव्वल... title=

चेन्नई :  महिलांसाठी एक कौतूकाची बातमी आहे. मद्रास उच्च न्यायालयात सर्वाधीक महिला न्यायाधीश आहेत. त्यामुळे महिला न्यायाधीशांमध्ये मद्रास उच्च न्ययालय पहिल्या तर, दिल्ली उच्च न्यायालय दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, मुंबई तिसऱ्या.

इतिहासात पहिल्यांदाच महिला न्यायाधिशांची संख्या 10 वर

प्राप्त माहितीनुसार, मद्रास उच्च न्यायालयात 11 महिला न्यायाधीश आहेत. तर, दिल्ली उच्च न्यायालयातील महिलां न्यायधीशांची संख्या 10 इतकी आहे. मद्रास उच्च न्ययालयात स्वीकृत न्यायाधीशांची संख्या 75 आहे परंतु, प्रत्यक्षात इथे 60 न्यायाधिशांनाच नियूक्त करण्यात आले आहे. विशेष असे की, इतिहासात पहिल्यांदाच एका न्यायालयात महिला न्यायाधिशांची संख्या 10वर गेली आहे. या न्यायाधीशांपैकी 4 महिला न्यायाधिशांनी एकाच वेळी शपथ घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात 9 महिला न्यायाधीश

दरम्यान, तामीळनाडूमध्ये स्थिती काहीशी वेगळी आहे. कारण, तेथे महिलांसाठी एक तृतियांश आरक्षण लागू असून, ही नियूक्ती अधीनस्थ न्यायपालीकेकडून केली जाते. मुंबई उच्च न्यायालात 9 महिला न्यायाधीश आहेत. जर, अलाहाबाद उच्च न्यायालयात एकूण 98 न्यायधीश आहेत. त्यापैकी महिला न्यायाधिशांची संख्या 6 इतकी आहे.

वाढत्या टक्क्याचा परिणाम

शिक्षणात वाढलेला मुलींचा टक्का आता कामाला येताना दिसतो आहे. त्याचा परिणाम देशभरात महिला महत्त्वाच्या पदांवर काम करताना दिसण्यात होत आहे. ही नोंद एक विक्रम म्हणूनही घेतली जात आहे.