Video : आधी देवीच्या पाया पडला आणि...; चोरीचा अनोखा व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Updated: Aug 10, 2022, 09:01 PM IST
Video : आधी देवीच्या पाया पडला आणि...; चोरीचा अनोखा व्हिडीओ व्हायरल title=

Madhya Pradesh Viral Video : चोरी, लुटमार करताना आता चोरांना कशाचाही धाक उरलेला नाही. चोरी करताना चोरांना आता देवाची भीती वाटत नाही. तर देवाचा आशीर्वाद घेऊनच चोर आपले कार्य पार पाडतात. असाच एक सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये एका चोराने मंदिरात लक्ष्मी देवीची हात जोडून पूजा केली आणि मंदिरातील दानपेटी घेऊन पळ काढला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चोर मंदिरात घुसून दानपेटी घेऊन पळून जात असताना काही सेकंदांसाठी देवीची पूजा करताना दिसत आहे. वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी पहाटे ४ वाजता जबलपूरच्या सुखा गावात ही घटना घडली. हा परिसर माधोतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो.

या व्हिडीओमध्ये एक चोर चोरी करण्याआधी देवीच्या पाया पडला आहे. त्यानंतर चोराने देवीच्या मुर्तीजवळ असलेली दानपेटी घेऊन पळ काढला. चोराच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर आश्चर्य वक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सुखा देवीच्या मंदिरावर लोकांची अपार श्रद्धा आहे. सुखा देवीचे मंदिर हे जबलपूरच्या जुन्या मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात हजारो भाविक येतात आणि नैवेद्यही देतात. लोक मंदिरात उदार मनाने दानही करतात.

प्रसादही केला चोरी

 व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार चोराने मंदिरातील दोन मोठ्या घंटाही चोरुन नेल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चोराने देवीला अर्पण कर्यात आलेला प्रसादही चोराने चोरून नेला आहे