अनेक वेळा लोक मांसाहार (Nonveg) खाण्यासाठी किंवा न खाण्यासाठी काही खास दिवस ठरवतात. या दिवशी अनेकदा कुटुंबियांमध्येच खाण्यावरुन वाद होतात. मात्र हा वाद तात्पुरत्या स्वरुपाचा असतो. पण मासांहार (Nonveg) करण्यावरुन हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) मंगळवारी पती-पत्नीमध्ये मटण (mutton) खाण्यावरून भांडण झाले. मात्र पती-पत्नीमधील या वादामुळे त्यांच्या शेजाऱ्याला जीव गमवावा लागलाय. पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. (madhya pradesh Neighbor lost his life in a quarrel between husband and wife)
आजतकच्या वृत्तानुसार, ही घटना भोपाळच्या (Bhopal) बिलखिरिया पोलीस ठाणे परिसरातील सागर मोहल्ला येथे घडल आहे. सागर मोहल्ला येथे राहणाऱ्या पप्पू अहिरवार नावाच्या व्यक्तीचा पत्नी कुंतीबाईसोबत वाद झाला होता. मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी पप्पूने घरी मटण (mutton) बनवण्यास सुरुवात केली. यावर पत्नी चिडली आणि पप्पूला मंगळवारी मटण न बनवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावरुन पप्पूने मारहाणही सुरू केल्याचा आरोप पत्नीने केला.
त्यानंतर शेजारी राहणारा बल्लू भांडणाचा आवाज आणि आरडाओरडा ऐकून दोघांकडे गेला. त्याने दोघांमधील भांडण मिटवले आणि आपल्या घरी परतला. या गोष्टीचा पप्पूला राग आला. काही वेळाने तो काठी घेऊन बल्लूच्या घरी गेला आणि त्याच्यावर हल्ला केला. डोक्याला मार लागल्याने बल्लू जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. हे पाहून पप्पूने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, पप्पूच्या पत्नीने फोनवरून पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पत्नीच्या जबाबाच्या आधारे पप्पूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही तासांनंतर पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. शवविच्छेदानानंतर बल्लूचा मृतदेह पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांकडे सोपवला.