LPG Gas Cylinder Price Today: लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर असतानाच केंद्राकडून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम करणाऱ्या या निर्णयांपैकीच एक म्हणजे गॅस सिलेंडरचे दर. काही दिवसांपूर्वीच शासनानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याता निर्णय घेतला. त्यातच आता निवडणुक काही दिवसांवर असतानाच शासनानं गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्याचा निर्णय घेतला. सातत्यानं तीन महिने दरवाढ होण्याचं सत्र यामुळं थांबलं.
1 एप्रिल 2024 या नव्या महिन्यापासून गॅस सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहे. अर्थात ही घट घरगुती गॅस सिलेंडरवर लागू नसून ती व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठीच लागू करण्यात आली आहे ही महत्त्वाची बाब.
एकंदर आकडेवारी पाहिली असता मार्च महिन्यामध्ये हे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. तर, फेब्रुवारी महिन्यात गॅसचे दर 14 रुपयांनी वधारले होते. जानेवारी महिन्यात ही वाढ अवघ्या 1.50 रुपये इतकी होती. दरम्यान, व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात सातत्यानं वाढ आणि त्यानंतर आता एप्रिल महिन्यात मोठी घट झालेली असतानाच घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे आहेत.
- चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले.
- मुंबईत सिलेंडरचे दर 31.50 रुपयांनी कमी झाले.
- दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजीचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले.
- कोलकाता येथे गॅस सिलेंडरचे दर 32 रुपयांनी कमी झाले.