बिहार: तिला त्याने लग्नाचे आमिष दिलं. प्रेमाच्या शपथा घेतल्या. गोड गोड बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आपलं सर्वस्व त्याला अर्पण केलं. दिवस सरत होते. प्रेमानं परमोच्च पातळी गाठली होती. लग्नाआधीच दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मुलीला दिवस गेले. सुरुवातील तो म्हणत होता, "मी तुझ्यासोबत लग्न करतो". मात्र अखेर त्याने पळवाटा शोधायला सुरुवात केली. शेवटी त्याने लग्नास नकार दिला. मुलगी 5 महिन्यांची गरोदर होती. प्रियकर पळ काढतोय असं लक्षात येताच तिने थेट गाठलं पोलीस स्टेशन. घटना बिहारच्या जहानाबाद इथली आहे.
प्रेयसी मुन्नी कुमारी पोलीस स्टेशनमध्ये होती. तिने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. मुन्नी कुमारीसोबत तिचे नातेवाईक सुद्धा होते. मुन्नीने सगळा प्रकार पोलिसांना खडा न खडा सांगितला. घटना सांगताना मुन्नीचे अश्रु थांबत नव्हते. घडला प्रकार गंभीर आहे. हे एव्हाना पोलिसांच्या ध्यानात आलं होतं. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. आरोपी प्रियकर सोने लालकुमार याला पकडण्यासाठी पोलिसांची एक टीम सुद्धा तैनात झाली. सुरुवातील माज दाखवणारा सोने लालकुमार याला कळालं की पोलीस आपला शोध घेत आहेत. तेव्हा त्याला घाम फुटला. त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी त्याला आपल्या खाक्या दाखवल्या. तसा तो पोपटासारखं बोलू लागला. अखेर पोलिसांनी या दोघांना घेतलं आणि एक मंदिर गाठलं. दोघांचे मंदिरात लग्न लावून दिलं.
मुलीच्या कुटुंबीयांनी माहिती दिली की, 'आरोपी मुलगा आणि मुलगी दोघे सुद्धा काको प्रखंड इथल्या काली इथले रहिवासी'. दोघांची नेहमी भेट व्हायची भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. एकेदिवशी मुलीची तब्बेत बिघडली. मुलीला घेवून कुटुंबीय डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कुटुंबीयांना माहिती दिली की, मुलगी गर्भवती आहे. डॉक्टरांनी दिलेली माहिती ऐकताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.
मुलीचे कुटुंबीय लग्नास तयार होते. पण मुलाने मात्र नकार दिला. अखेर प्रकरण पोलिसांत गेलं. पोलिसांनी हे प्रकरण निकाली लावत दोघांचे लग्न लावून दिलं