ऑगस्ट महिन्यात आली मोठी सुट्टी, करा पिकनिकची तयारी

भारतीयांसाठी ऑगस्ट महिन्यात उत्तम संधी चालून आली आहे. फिरण्याची आवड असणाऱ्यांना आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवण्यासाठी मोठा वेळ मिळणार आहे. 12 ते 20 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्यदिन आणि पारसी नववर्ष अशी सुट्टी एकाच आठवड्यात येत आहे, यामुळे थोडी पूर्वयोजना आखल्यास चांगला मोठा वीकेण्ड मिळू शकतो. स्थानिक आणि अगदी पटकन जाता येतील अशा ठिकाणांना यंदाच्या मोसमात भारतीयांची पसंती आहे.

Updated: Jul 26, 2017, 04:13 PM IST
ऑगस्ट महिन्यात आली मोठी सुट्टी, करा पिकनिकची तयारी title=

मुंबई : भारतीयांसाठी ऑगस्ट महिन्यात उत्तम संधी चालून आली आहे. फिरण्याची आवड असणाऱ्यांना आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवण्यासाठी मोठा वेळ मिळणार आहे. 12 ते 20 ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्यदिन आणि पारसी नववर्ष अशी सुट्टी एकाच आठवड्यात येत आहे, यामुळे थोडी पूर्वयोजना आखल्यास चांगला मोठा वीकेण्ड मिळू शकतो. स्थानिक आणि अगदी पटकन जाता येतील अशा ठिकाणांना यंदाच्या मोसमात भारतीयांची पसंती आहे.

कॉक्स अँड किंग्जने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय आरक्षणांमध्ये 15-20 टक्क्यांची वाढ झाल्याचे म्हटले आहे. मोठ्या वीकेण्डबरोबरच पावसाळ्यामुळेही अनेक योजना आखल्या जात आहेत, लांबणीवर पडलेल्या योजनांना चालना मिळत आहे.

प्रवासी बाजारपेठेच्या ऑनलाइन विभागात Ezeego.1ने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पटकन जाता येतील अशा ठिकाणे प्रवासासाठी लोकांनी निवडली असून, यात 20 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे नमूद केले आहे. सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांविषयी, Ezeego.1च्या सीईओ आणि संचालिका नितु सिंग म्हणाल्या की, ``थायलंड, बाली, मॉरिशस, मालदिव आणि श्रीलंका अशा व्हिसा ऑन अरायव्हल असलेल्या देशांना लोकांची अधिकाधिक पसंती आहे.’’ त्या पुढे असेही म्हणाल्या की, ``व्हिसामध्ये अडचणी नाहीत, सुलभता, स्वस्त विमानदर, बजेटला परिपूर्ण आणि शाकाहारी प्रवाशांसाठी सुयोग्य आहार अशा सर्व गोष्टींमुळे ही ठिकाणे जास्त प्रमाणात निवडली जातात.’’

``ऑगस्ट महिन्यात भारतीय सणांना सुरुवात होते, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही या काळात सण साजरे केले जातात, असे कॉक्स अँड किंग्जचे रिलेशनशीप प्रमुख करण आनंद म्हणाले. ``त्या सणांचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रवासी प्रवास करतात. खास करून युरोप कार्निवल, मेडिवल फेअर आणि म्युझिक फेस्ट अशा ख्यातनाम कार्यक्रमांची जंत्री पुढील महिन्यात सुरु होते. तसेच ला टमाटिना (स्पेन), एडिनबर्ग फेस्टिवल (स्कॉटलंड), नॉटिंग हिल कार्निवल (लंडन), साल्झबुर्ग फेस्टिबल (ऑस्ट्रिया), बर्लिन बिअर फेस्टिवल (जर्मनी) यासारखे फेस्टिवल्स भारतीयांना आकर्षित करतात.’’

भारतीय स्थानिक सुट्टया घेत आहेत, याविषयी आनंद म्हणाले की, ``आता पावसाळ्याला ऑफ सिझन वगैरे समजले जात नाही. मोठा वीकेण्ड आणि पावसाळ्यातील मोसमातील सवलती एकत्र करून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या सहलींचे आयोजन करतात.’’ यात पुढील काही ठिकाणांचा समावेश आहे, ते म्हणाले, ``गोना, मरारी (केरळ), पूवर (केरळ), गोपालपूर (ओडिशा), मंदारमणी (पश्चिम बंगाल), पाँडिचेरी (तमिळनाडू) यासारख्या स्थानिक प्रवाशांच्या निवडीच्या ठिकाणांचा समावेश आहे.’’

आरक्षणाच्या बाबतीत ग्राहक आपल्या विमानाची तिकिटे दोन महिने आधीच काढून ठेवतात, कारण आयत्या वेळेस केलेल्या आरक्षणामुळे प्रवासी बजेटमध्ये 30 टक्क्यांची वाढ होते, ऑनलाइन प्रवासी बाजारपेठांच्या तुलनेत, Ezeego.1ने हे नमूद केले आहे.

प्रवाशांच्या भौगोलिक बाबींविषयी सिंग विस्तारपूर्वक सांगत होत्या की, ``सर्वात जास्त आरक्षणे कौटुंबिक होतात, याशिवाय सर्व महिलांचे गट, डबल इन्कम नो किड्स (डिंक) आणि नव्याने लग्न झालेली जोडपी अशा सर्वांचा यात समावेश असतो. बालीचे अद्भुत सौंदर्य आणि आरामदायी वास्तव्य अनुभवण्यासाठी ऑगस्ट महिना अतिशय आवडता आहे, हनीमून पॅकेजे आणि इतर सर्वोत्तम विक्री होणारी आमची उत्पादने याच कालावधीत जास्त होतात.’’

थरारक सहली हव्या असणाऱ्यांनाही हा वीकेण्ड वाया घालवायचा नाहीये, असे करण आनंद सांगतात. कॉक्स अँड किंग्जच्या ट्रिप 360चे उद्घाटन अशाच थरारक बाइकिंग योजनांसाठी करण्यात आले आहे, याद्वारे बाइकिंग अक्रॉस लडाख (7 दिवस/6 रात्री, डिपार्चर – 15 ऑगस्ट), मनाली ते लेह बाइकिंग (10दिवस/9 रात्री, डिपार्चर – 12 ऑगस्ट), व्हॅली ऑफ फ्लॉवर्स इन हार्ट ऑफ द हिमालयाज (6 दिवस/ 5 रात्री, डिपार्चर – 12 ऑगस्ट) आणि फॅसिनेटिंग लडाख ऑन सायकल (8 दिवस/7 रात्री, ऑगस्ट 25)  अशा विविध योजनांची सेवा दिली जाते.

मोठ्या वीकेण्डचा तक्ता

अनुक्रमांक

तारीख आणि दिवस

सहली

1

शनिवार-12-ऑगस्ट

वीकेण्ड

2

रविवार-13-ऑगस्ट

वीकेण्ड  

3

सोमवार-14-ऑगस्ट

जन्माष्टमी (प्रतिबंधित सुट्टी)

4

मंगळवार-15- ऑगस्ट

स्वातंत्र्य दिवस (राष्ट्रीय सुट्टी)

5

बुधवार-16- ऑगस्ट

एक सुट्टी घ्या.

6

गुरुवार-17- ऑगस्ट

पारसी नव वर्ष (केवळ मुंबई)

7

शुक्रवार-18- ऑगस्ट

एक सुट्टी घ्या.

8

शनिवार-19- ऑगस्ट

वीकेण्ड

9

रविवार-20- ऑगस्ट

वीकेण्ड