LokSabha Opinion Poll : पीएम मोदी विजयाची हॅटट्रीक साधणार की? जनता इंडिया आघाडीला साथ देणार?... पाहा जनतेचा कौल

loksabha opinion poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंघाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे.

राजीव कासले | Updated: Feb 28, 2024, 07:18 PM IST
LokSabha Opinion Poll :  पीएम मोदी विजयाची हॅटट्रीक साधणार की? जनता इंडिया आघाडीला साथ देणार?... पाहा जनतेचा कौल title=

Zee News-MATRIZE Lok Sabha Opinion Poll Live: लोकसभा निवडणुकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाईल. या पार्श्वभीमीवर Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल अर्थात जनतेचा कौल काय आहे याचा अंदाज घेतला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंघाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 5 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आले आहे. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1 लाख 67 हजार 843 लोकांची मतं घेण्यात आली. ज्यामध्ये 87 हजार पुरुष आणि 54 हजार महिलांचा समावेश आहे. याशिवाय या ओपिनियन पोलमध्ये 27 हजार नवमतदारांची मतंही समाविष्ट करण्यात आली आहेत. ओपिनियन पोलच्या निकालांमध्ये एक ते दोन टक्क्यांचा फरक पडू शकतो. हे निवडणुकीचे निकाल नाहीत, हा फक्त ओपिनियन पोल आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही. 

कर्नाटकात एनडीएला आघाडी
- Zee News-Matrize च्या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकात NDA ला आघाडी मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात एनडीएला 23 lj काँग्रेसला 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

आंध्रप्रदेशमध्ये जनतेचा कौल
- Zee News Matrize च्या ओपिनियन पोलनुसार आंध्रप्रदेशमध्या YSRCP ला 19 जागा तर TDP ला 67जागा मिळण्याची शक्यता आहे. ओपिनिअन पोलनुसार भाजप आणि काँग्रेसला खातंही खोलता येणार नाही.

तेलंगनात काय आहे स्थिती
- Zee News Matrize च्या ओपिनियन पोलनुसार  तेलंगनात  BJP ला 5 जागा आणि कांग्रेसला 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

केरळमध्ये काय परिस्थिती
- Zee News Matrize च्या ओपिनियन पोलनुसार केरळात 20 जागा इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इथं भाजपाचं खातंही उघडणार नाही असा अनुमान आहे. 

तामिळनाडूत काय होणार
- Zee News Matrize च्या ओपिनियन पोलनुसार तामिळनाडूच्या 39 जागांपैकी इंडिया आघाडीला सर्वाधिक 36 जागा मिळू शकतात. तर एनडीला एका जागेवर समाधान मानावं लागू शकतं.