कपड्यांच्या बाजारातही लोकसभा निवडणुकीची झलक

कपडा बाजारात नवा ट्रेंड

Updated: Feb 14, 2019, 07:08 PM IST
कपड्यांच्या बाजारातही लोकसभा निवडणुकीची झलक title=

सुरत : लोकसभा निवडणुकीचे पडघम कपड्यांच्या बाजारातही पाहायला मिळत आहेत. सूरतच्या बाजारात सध्या नवा ट्रेंड दिसतो आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच निवडणुकीचं वातावरण तयार झालं आहे. गुजरातच्या सूरतमध्ये नमो कुरते., मोदी कुरते, मोदी जॅकेट पाहायला मिळत आहेत. आता खास महिलांसाठी देखील नमो कुरते, नमो टीशर्टस, नमो जॅकेटस बाजारात आले आहेत. नमो अगेनचे टीशर्ट ही बाजारात उपलब्ध झाले आहेत.

600 से 1600 रुपयांपर्यंत या कुरत्यांची किंमत आहे. खादी, कॉटन मटेरियलमध्ये हे कुरते बाजारात उपलब्ध आहेत. खास करुन महिलांचा या कुरत्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नमो कुरत्यांसाठी आता सूरतबाहेरुनही मागणी वाढली आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल, तसे लोकसभा निवडणुकीचे नवे रंग कपड्यांच्या बाजारातही पाहायला मिळणार आहेत.

Image result for namo tshirt zee

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्ये लोकांशी संपर्क साधत आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी नवीन नवीन गोष्टी केल्या जात आहेत.