मुंबई : राज्यात प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आचारसंहिता लागल्यानंतर काही पक्षांनी आपले काही उमेदवार घोषित केले आहेत. तर काही उमेदवारांची चाचणी सुरु आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात बहुजन समाज पक्ष ४८ जागा लढवणार आहे. बसपाचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे यांनी ही माहिती दिली आहे. मायावतींना पंतप्रधान करायचं असल्यास बसपाला मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं आहे. बहुजन समाज पक्ष लवकरच उमेदवारांची घोषणा करणार आहे.
बहुजन समाज पक्ष २० मार्चला पहिली यादी जाहीर करेल अशी शक्यता आहे. पहिल्या यादीत विदर्भातील बहुतांश मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा होऊ शकते. देशात समाजवादी पक्षा व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात बसपा काँग्रेससोबत आघाडी करणार नाही अशी घोषणा याआधीच मायावती यांनी केली होती. त्यामुळेच बसपा स्वबळावर निवडणुका लढवणार आहेत.