'शेजारी दहशतवादाची फॅक्टरी आणि विरोधक म्हणतात हा मुद्दाच नाही'

पंतप्रधान मोदी आज बिहारच्या दरभंगा आणि मधुबनी येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली.

Updated: Apr 25, 2019, 12:37 PM IST
'शेजारी दहशतवादाची फॅक्टरी आणि विरोधक म्हणतात हा मुद्दाच नाही' title=

दरभंगा : शेजारी राष्ट्रात दहशतवादाची फॅक्टरी आहे आणि विरोधक म्हणतात की निवडणुकीचा मुद्दा नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दहशतावादाच्या मुद्द्यावर राजकारण करतात अशी टीका विरोधकांकडून केली जाते. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. पंतप्रधान मोदी आज बिहारच्या दरभंगा आणि मधुबनी येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा एअर स्ट्राईक आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर हात घातला आहे. 21 शतकात जे मतदार पहील्यांदाच मतदान करत आहेत तेच देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यांना जाती-पाती, धर्म-पंथाचे समीकरण समजत नाही. अशा युवा मतदारांना एनडीएवर विश्वास असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

40 वर्षांपुर्वी प्रत्येकजण सामान्य आयुष्य जगायचे. आज ज्या पैशांतून गरीबांसाठी शाळा आणि रुग्णालय बनायला हवीत त्या पैशातून आम्हाला बॉम्ब, बंदूक आणि पिस्तूल खरेदी करावी लागत आहे. दहशतवाद संपवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. नव्या भारतात देशाची सुरक्षा मोठा मुद्दा आहे. हा नवा हिंदुस्थान आहे ते दहशतवाद्यांना घरात घुसून मारेन. तुमचा चौकीदार सतर्क असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

देशासाठी मजबूत पंतप्रधानाची गरज असताना 8,10 आणि 40 जागा जिंकणारेही पंतप्रधान बनण्याची स्वप्न पाहत आहेत. पण पंतप्रधानांच्या शर्यतीत जितके चेहरे आहेत त्यातील दहशतवाद कोण संपवू शकतो ? असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी नावाचा गजर केला. दहशतवाद मोदी  संपवणार नाही तर तुमचे एक मत संपवू शकते. दहशतवाद संपवण्यासाठी मजबूत पंतप्रधानाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

भारत माता की जय आणि वंदे मातरम हीच आमची शक्ती आहे. पण काही लोकांना यापासून अडचण आहे. अशा लोकांचे डिपॉझिट जप्त झाले पाहीजे. गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही घराघरांमध्ये वीज पोहोचवली आणि पुढच्या पाच वर्षांमध्ये पाणी पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले. पाण्यासाठी स्वतंत्र जल शक्ति मंत्रालय बनवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट होण्यासाठी आमचे सरकार काम करत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. 23 मेनंतर सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान समृद्धी योजनेचा लाभ मिळणार असल्याचे ते म्हणाले.