मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या बोटावर शाई, यूपीत धक्कादायक प्रकार

 मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदारांच्या बोटावर जबरदस्ती शाई लावल्याचा संतापजनक प्रकार

Updated: May 19, 2019, 10:33 AM IST
मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या बोटावर शाई, यूपीत धक्कादायक प्रकार  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. पण मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदारांच्या बोटावर जबरदस्ती शाई लावल्याचा संतापजनक प्रकार चंदौली येथे समोर आला आहे. जबरदस्ती शाई लावण्यासोबतच मतदाराच्या हातात 500 रुपयेही देण्यात आले. एसडीएम कुमार हर्ष यांनी हे प्रकरण समोर आणले आहे. 

Chandauli: 3 people allege ink was forcefully applied to their fingers before 7 phase of voting

चंदौली लोकसभा क्षेत्रातील ताराजीवनपूर गावात दलित वस्तीतील नागरिकांनी भाजपा कार्यकर्त्यांवर मत न देण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप लावला आहे. मत देण्यासाठी आम्हाला केवळ पैसेच दिले नाहीत तर मतदान करु नये म्हणून बोटाला शाई देखील लावण्यात आल्याचे गावकरी सांगतात. कोणाला याबद्दल सांगू नका असे म्हणत पाचशे रुपये दिल्याचा आरोपही गावकऱ्यांनी सांगितले. 

न्यूज एजंसी एएनआयने मतदारांच्या बोटांच्या शाईचे फोटो समोर आणले आहेत. त्यांना देण्यात आलेली कथित रक्कम देखील यामध्ये दिसत आहे.

Chandauli: 3 people allege ink was forcefully applied to their fingers before 7 phase of voting यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. आमच्या बोटावर जबरदस्ती शाई लावण्यात आल्याचे तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत लिहिले तर अजूनही त्यांना स्वत:च्या मतदानाचा हक्क बजावता येईल असे सांगण्यात येत आहे.