चालत्या ट्रेनमध्ये Loco Pilot ला लागली दारुची तलप, गाडी मध्येच सोडून निघून गेला

दारु पिण्याची सवय किती वाईट असते. या घटनेवरुन हे लक्षात आलंच असेल.

Updated: May 4, 2022, 06:23 PM IST
चालत्या ट्रेनमध्ये Loco Pilot ला लागली दारुची तलप, गाडी मध्येच सोडून निघून गेला

हसनपूर : बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर रेल्वे स्थानकावर एका लोको पायलटने दारूसाठी तासभर ट्रेन थांबवली. हसनपूर येथे साधारणपणे दोन मिनिटे थांबणारी ही गाडी २ मे रोजी संध्याकाळी तासभर उभी होती. प्रवाशांच्या विरोधानंतरच रेल्वे अधिकाऱ्यांना लोको पायलटच्या या गोष्टीची माहिती मिळाली.

स्टेशनवर ट्रेन थांबवून लोको पायलट गायब

पॅसेंजर ट्रेन क्रमांक 05278 ने सोमवारी संध्याकाळी 4:05 वाजता समस्तीपूर रेल्वे स्थानकावरून प्रवास सुरू केला आणि हसनपूर येथे 5:45 वाजता पोहोचली. हसनपूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर मनोज कुमार चौधरी म्हणाले, 'जेव्हा प्रवासी रेल्वे स्टेशनवर आंदोलन करत होते, तेव्हा आम्ही ड्रायव्हरच्या केबिनमध्ये गेलो होतो. को-पायलट करमवीर यादव उर्फ ​​मुन्ना इंजिन रूममधून बेपत्ता होता.

हसनपूर बाजारपेठेत नशेच्या अवस्थेत सापडला लोको पायलट

त्यांनी पुढे सांगितले की, हसनपूर मार्केटमध्ये एक व्यक्ती नशेच्या अवस्थेत गोंधळ घालत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तिथे पोहोचल्यावर आम्ही त्याला अटक केली. करमवीर यादव हे हसनपूर येथील ट्रेनचे लोको पायलट असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून दारूची अर्धी बाटलीही जप्त करण्यात आली आहे. आम्ही त्याला अटक केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. या घटनेनंतर समस्तीपूर झोनचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) आलोक अग्रवाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली.

दुसऱ्या लोको पायलटने पुढे नेली रेल्वे

लोको पायलट व्हीसी राजकुमार, जो रजेवर होता, परंतु त्याच ट्रेनमधून प्रवास करत होता आणि सहरसाला जात होता, करमवीर यादव मद्यधुंद अवस्थेत आढळल्यानंतर त्याला पदभार देण्यात आला. अखेर ट्रेनने हसनपूर रेल्वे स्थानक 6.45 वाजता सोडले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x