नवी दिल्ली : coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात दर दिवशी बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यातच आता भारतीय रेल्वेकडून आता एक नवी माहिती समोर आणण्यात आली आहे. ज्याअंतर्गत कोरोनाची लक्षणं असणाऱ्या ज्या प्रवाशांना तिकीटं देण्यात आली आहेत, त्यांना आता रेल्वेने प्रवास करता येणार नसून, संबंधित प्रवाशांच्या तिकीटाचे पूर्ण पैसे परत केले जाणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेने प्रवास करु पाहाऱ्यांची चाचणी करुन ज्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत, अशाच नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशानुसार चाचणीदरम्यान जर, कोणत्याही प्रवाशाच्या शरीराचं तापमान जास्त आढळून आलं किंवा त्यात कोविड 19ची कोणतीही लक्षणं आढळल्यास कन्फर्म तिकीट असुनही अशआ प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात येणार नाही. या परिस्थितीमध्ये प्रवाशांना त्यांच्या तिकीटाची पूर्ण रक्कम परत केली जाणार आहे.
वाचा : तिरुपती देवस्थानला लॉकडाऊनचा फटका; नुकसानाचा आकडा वाचून बसेल धक्का
एका तिकीटावर अन्य प्रवाशांचंही आरक्षित तिकीट असल्यास आणि ते प्रवासी रेल्वे प्रवास करु इच्छित असल्यास या प्रसंगी फक्त प्रवास न करणाऱ्याच प्रवाशाच्या तिकीटाचं भाडं परत दिलं जाणार आहे.
कोरोना विषाणूचा देशात अतिशय झाट्याने वाढणारा संसर्ग पाहता शक्य त्या सर्व परिंनी सावधगिरी बाळगली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच लॉकडाऊनच्या काळात सुरु करण्यात आलेल्या खास रेल्वे सुविधा आणि श्रमिक रेल्वेमध्येही सर्वच बाबतीच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत.