"माझं Death Certificate हरवलं..."; जिवंत व्यक्तीची जाहिरात पाहून बसेल धक्का

वृत्तपत्रातील या जाहिरातीने सर्वानाच धक्का बसलाय

Updated: Sep 24, 2022, 04:43 PM IST
"माझं Death Certificate हरवलं..."; जिवंत व्यक्तीची जाहिरात पाहून बसेल धक्का title=

Death Certificate : वर्तमानपत्रात (Newspaper) छापलेली एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल होत आहे. दररोज हजारो जाहिराती वृत्तपत्रांमध्ये छापल्या जातात पण ही जाहिरात पाहून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. या जाहिरातीद्वारे एका जिवंत व्यक्तीने त्याचे मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate) हरवल्याचं म्हटलं आहे.

या जाहिरातीवरुन जिवंत माणसाचा मृत्यूचा दाखला (Death Certificate) कसा बनवता येईल, असा प्रश्न लोकांमध्ये उपस्थित होत आहे. जरी चुकून तो तयार झाला असला तरी, वृत्तपत्राच्या जाहिरातीत (Newspaper Advertisement) त्याची माहिती कशी छापली जाऊ शकते. तसेच जाहिरात छापणारी व्यक्ती स्वतःचा मृत्यू प्रमाणपत्र हरवल्याचा दावा करतेय असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

आसाममधील होजाई जिल्ह्यातील लामडिंगच्या सिमुलतला येथील रहिवासी रणजीत कुमार चक्रवर्ती (Ranjit Kumar Chakraborty) यांनी ही जाहिरात दिली आहे. माझे मृत्यूचे प्रमाणपत्र हरवले आहे. 07/09/2022 रोजी सकाळी 10:00 च्या सुमारास लामडिंग बाजार येथे माझ्याकडून ते हरवले, असं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्याने मृत्यू प्रमाणपत्राचा नोंदणी क्रमांक आणि नावही दिले आहे. तसेच त्याचा संपूर्ण पत्ता जाहिरातीत देण्यात आला आहे.

दरम्यान, या जाहिरातीवरुन आता अनेक मजेदार मीम्स शेअर केले जात आहेत. यावर आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी खिल्ली उडवली आणि 'इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया' असं ट्विट केलं आहे. तर इतर युजर्स हे या व्यक्तीने स्वर्गातून (Heaven) मृत्यू प्रमाणपत्र गमावल्याची तक्रार केली आहे का असा सवाल केला आहे.